12 December 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
x

अमित शहांच्या मणिपूर भेटीनंतर 2 दिवसांनी पुन्हा दंगली भडकल्या, 3 नागरिक ठार, जमावाने भाजप आमदारचं घर जाळून टाकलं

Manipur Violence

Manipur Violence | मणिपूरमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अशांततेनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 105 वर पोहोचला आहे. मैतेई आणि कुकी समाजातील संघर्ष थांबताना दिसत नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवस आधीच मणिपूरला भेट दिली होती. गेल्या दोन दिवसांत एकही हिंसक घटना घडली नाही. पण शुक्रवारी पुन्हा एकदा तणावपूर्ण शांततेचे रूपांतर उपद्रवात झाले. मैतेई आणि कुकी समाजातील लोकं भाजपच्या आमदार नेत्यांना बघूनच घेत नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे भाजप नेत्यांची घर जाळण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. लोकं शोधून भाजप नेत्यांना मारत आहेत.

ईशान्येकडील राज्यात ५३ टक्के लोकसंख्या मैतेई समाजाची आहे, जी मूळची खोऱ्यात स्थायिक आहे. याशिवाय कुकी समाजातील १६ टक्के लोक आहेत, त्यांची बहुतांश लोकसंख्या डोंगराळ भागात वसलेली आहे. उच्च न्यायालयाने मैतेई समाजाला एसटीचा दर्जा द्यावा, असे सुचविल्यानंतर राज्यात हिंसाचार उसळला होता. या प्रस्तावाला कुकी समाजाने विरोध केला आणि त्यासाठी ते सातत्याने आंदोलन करत होते.

मणिपूरमध्ये ३ मे रोजी अशाच एका मोर्चादरम्यान हिंसाचार उसळला आणि तेव्हापासून परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. या हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 40 हजार लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे. 300 हून अधिक लोकं जखमी झाली आहेत.

मैतेई आणि कुकी समाजातील दरी पुन्हा वाढणार
या हिंसाचारानंतर राज्यात मैतेई विरुद्ध कुकी असा संघर्ष तीव्र झाला आहे. यामध्ये भाजपच्या आमदारच घर जाळून टाकण्यात आलं आहे. त्यासाठी जमावाने स्फोटकांचा वापर केल्याचं वृत्त आहे. हा हल्ला मैतेई गटाच्या लोकांनी केल्याचा आरोप इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने केला आहे. या भागात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते, पण ते घटनास्थळी नव्हते. जेव्हा हा हल्ला झाला. या घटनेमुळे मणिपूर प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.

News Title : Manipur violence erupted again BJP MLA house burned check details on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Manipur Violence(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x