23 April 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा
x

अमित शहांकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत | त्यांनी माध्यमंही विकत घेतली आहेत - ममता बॅनर्जी

Hinduism, West Bengal, CM Mamata Banerjee, Amit Shah

कोलकत्ता, २८ जानेवारी: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भारतीय जनता पक्षाने देखील त्याच अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यानिमित्ताने अमित शाह आणि जे पी नड्डा यांनी देखील दौरे केल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.

भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांनी देखील तृणमूल काँग्रेसचे नेते फोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही सरकार पुरस्कृत माध्यमांना हाताशी धरून संपूर्ण पश्चिम बंगाल भाजप मय झाल्याचा भास निर्माण केला जातं आहे. परिणामी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारनं घाई गडबडीत आणलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ममतांनी केली आहे. ‘असा विरोध होत राहिला, तर सुधारणा होणार नाही. कायद्याला एक संधी द्यायला हवी. विरोधक शेतकऱ्यांचा वापर करून घेत आहे. असा आरोप सरकारकडून होत आहे,’ असा प्रश्न ममतांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या,”शेतकरी आंदोलनात एकही राजकीय नेता नाही. शेतकरी स्वतःच लढा देत आहेत. ही नवी घटना आहे. आम्ही शेतकऱ्यांना बाहेरून पाठिंबा देत आहोत. माझे भाऊ, अमित शाह म्हणाले होते की, त्यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत. त्यामुळे त्यातून ते शेतकऱ्यांची बदनामी करण्यासाठी ते काही पसवू शकतात. सरकारनं माध्यमंही विकत घेतली आहेत,” असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

 

News English Summary: There is no political leader in the peasant movement. The farmers are fighting on their own. This is a new phenomenon. We are supporting the farmers from outside. My brother Amit Shah had said that he has 51 lakh WhatsApp groups. So they can use it to discredit the farmers. The government has also bought the media, ”said Mamata Banerjee.

News English Title: I am ready for a debate on Hinduism said West Bengal CM Mamata Banerjee news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x