13 December 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Shinde Camp Ministers | शिंदेंच्या दिल्ली भेटीतच शिंदे गटातील मंत्र्यांना डच्चू देण्याचा कार्यक्रम निश्चित झाला? शिंदेही साथ देणाऱ्यांच्या विरोधात?

Shinde Camp Ministers

Shinde Camp Ministers | महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार छोटा असू शकतो, असे बोलले जात आहे. पण त्याआधीच एका महत्त्वाच्या घडामोडीने शिंदे अडचणीत सापडले आहेत.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटातील चार ते पाच मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले होते असं महत्वाचं वृत्त भाजपच्या गोटातील प्राप्त झालं आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर चकार शब्द देखील न काढता भाजप वरिष्ठांचे आदेश मान्य केल्याचे देखील समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी अडचण अशी आहे की, शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरेंविरोधात झालेल्या बंडखोरीच्या वेळी त्यांना साथ देणाऱ्या काही वाचाळवीर नेत्यांना मंत्रिपदावरून हटवलं जाणार असल्याने शिंदे सुद्धा राजकीय दडपणात आल्याची माहिती आहे.

तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या गटातील अनेक आमदारांचे आयत्यावेळी तिकीट कापण्यात येणार असून त्याचे अधिकार देखील भाजपच्या वरिष्ठांकडे असणार आहेत असं या भाजपच्या नेत्याने नाव ना छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार शिंदे गटातील कोणत्या आमदार आणि खासदारांना तिकीट देऊ नये यासाठी भाजपने आधीच आराखडा तयार केल्याची माहिती या नेत्याने दिली आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाला नाही तरी काही कॅबिनेट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तर दुसरीकडे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे गटाचे म्हणणे असले तरी वास्तव वेगळंच आहे.

शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड या पाच मंत्र्यांवर भाजपविरोधाची टांगती तलवार आहे असं वृत्त आहे. या पाच जणांना लवकरच मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी चर्चा दिल्लीत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता भाजप हायकमांडविरोधात बंड करावं की त्यांना पाठिंबा देतं स्वतःचं राजकीय आयुष्य पणाला लावावं असा गोंधळ शिंदे गटात होण्याची शक्यता आहे.

आमदारांचा वाढता दबाव

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला तरी तो छोटाच असेल. साधारणपणे ९ ते १० नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. मात्र, त्यांना मंत्री करण्यासाठी आमदारांकडून शिवसेना आणि भाजप नेतृत्वावर प्रचंड दबाव आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं होतं. आता या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे आदेश देण्यात आल्याने एकनाथ शिंदे चिंतेत आहेत. याच कारणास्तव एकनाथ शिंदे सुट्टी घेऊन काश्मीरला गेले होते, अशीही चर्चा आहे.

बरखास्त करण्याचा दबाव का?

अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड हे सरकार स्थापनेपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडले आहेत. सुरुवातीच्या काळात तानाजी सावंत यांनी आपल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण केला होता. तसेच आरोग्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सर्वाधिक वादग्रस्त ठरले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी केलेलं विधान निवडणुकीच्या वेळी अंगलट येऊ शकतात असं भाजपाला वाटत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जमीन प्रकरणात अब्दुल सत्तार यांना फटकारले आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस सत्तार यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यानुसार दिल्लीत रिपोर्ट देण्यात आला होता अशी माहिती आहे.

भाजपच्या गोटात इतरांविरोधात संताप

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात भाजपच्या गोटात नाराजी आहे. त्यांच्या काही उद्योगांमुळेच आणि गरळ ओकणाऱ्या टिपण्यांमुळे ते चर्चेत आहेत. तर दुसरीकडे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री म्हणून निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्याच मतदारसंघातील अनेक गावे पाण्यासाठी ताहो फोडत आहेत. शिवाय कापसाचे संकट दूर करण्यात ते अपयशी ठरले आहेत. हंगामातील सुमारे ३० ते ४० टक्के पीक अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे अशी माहिती समोर आली आहे.

भाजपने गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी भाजपने दिल्लीत केली आहे. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश पहिल्या दिवसापासून वादग्रस्त होता. संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात एका तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप होता. भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर होत्या. तरीही संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मात्र, राज्य केमिस्ट अँड ड्रग असोसिएशनने अन्न व औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विशेष म्हणजे ही संघटना आधीपासूनच भाजपच्या जवळची म्हणून ओळखली जाते. यामागे फडणवीस समर्थकांचा हात होता असं म्हटलं जातंय.

News Title : Shinde Camp Ministers in danger check details on 12 June 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x