15 May 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Multibagger Stock | सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! एका वर्षात 312 टक्के परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • Multibagger Stock
  • शेअरची 52 आठवड्यांची पातळी
  • कंपनीबद्दल थोडक्यात
  • तिमाही कामगिरी
Multibagger Stock

Multibagger Stock | माझगांव डॉक शिपबिल्डर्स या सरकारी मालकीच्या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 312.75 टक्के नफा मिळवून दिला आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी BSE-500 इंडेक्समधील टॉप गेनर्स कंपनी मानली जाते.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 229.65 रुपये होती. नीचांक पातळी किमतीच्या तुलनेत या शेअरची किंमत 338 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 1,047.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात

माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही सरकारी कंपनी भारतीय नौदलासाठी युद्धनौका बनवण्याचे काम करते. माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या उत्पादनांमध्ये मालवाहू जहाजे प्रवासी जहाजे, पुरवठा जहाजे, बहुउद्देशीय समर्थन जहाजे, आणि बरेच उपकरण सामील आहेत. मागील काही वर्षात भारत सरकारने आपले लक्ष संरक्षण क्षेत्राकडे केंद्रित केले आहे. याचाच परिणाम आता संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी भारत हा जगात सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणारा देश होता. मात्र आता भारत हा ट्रेंड बदलण्याचा प्रयत्न करत आहे. याचे सकारात्मक परिणाम पुढील काळात आपल्याला पाहायला मिळतील.

तिमाही कामगिरी

जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात 105 टक्के वाढी नोंदवली आहे. मार्च 2023 मध्ये या कंपनीने 326.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने 1396.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 2,078,59 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.71 टक्क्यांच्या वाढीसह 1033.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Mazagon Dock Shipbuilders Ltd share price today on 12 June 2023

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x