12 December 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख | अखेर दुरुस्त

BJP official website, MP Raksha Khadse, Wrong information

जळगांव, २८ जानेवारी: रावेर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केलेला स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून भाजपला चूक सुधारण्यास सांगितले होते.

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भारतीय जनता पक्षाने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षाने अधिकृत वेबसाईटवर तातडीने आपली चूक सुधारली आहे. हिंदी भाषेच्या गुगल ट्रान्सलेटमुळे हा घोळ झाला असावा, असं म्हटलं जात आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रकारबद्दल काही प्रतिक्रिया दिली नसून अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाही.

 

News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) MP from Raver constituency Raksha Khadse was wrongly mentioned on the BJP’s website. The official website of the Bharatiya Janata Party has information about MPs from across the country. It mentions name, photo and constituency. However, while mentioning Raksha Khadse’s constituency Raver, the offensive screenshot mentioned on this website went viral everywhere. Mentioning such vulgar words about our own female MP had created a stir. After that, state Home Minister Anil Deshmukh tweeted and asked the BJP to correct the mistake.

News English Title: BJP official website correct MP Raksha Khadse information news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x