11 May 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात?

Video Viral

Shinde Camp Thane Politics | कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत पहिली ठिणगी पडल्याचे चित्र समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या याच भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट कल्याणच्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीवरुन भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. भाजप नेत्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला की, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेला सहकार्य करायचे नाही. याच निर्णयामुळे कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेत पहिली ठिणगी पडली आहे.

भाजपकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांवर श्रीकांत शिंदे म्हणाले, “आम्हाला आव्हानं देण्याचं काम या लोकांनी करू नये. या ठिकाणी शिंदे यांनी दहा महिन्यापूर्वी जे केलं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे. जर हे पाऊल उचललं नसतं, तर काय परिणाम झाले असते, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. गेल्या 9 वर्षांपासून मला कल्याण लोकसभेतून मोठ्या मताधिक्याने जिंकून दिलं. तेव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय. आताच उल्हासनगरमध्ये 55 कोटी रुपये भाजपच्या नगरसेवकांना देण्याचं काम झालं. जीआर निघाला, त्याचे टेंडर निघतील. एवढं सगळं चांगलं काम सुरू असताना मला वाटतं कुणी शुल्लक कारणावरून युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये.

सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील यासाठी काम केले पाहिजे. यामध्ये स्वार्थ ठेवायला नको. मलाही कुठला स्वार्थ नाही. मला जर उद्या सांगितलं की, कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी पक्ष आणि युतीचं काम करायला तयार आहे. पक्षनेतृत्वाने असो वा भाजपने सांगितलं की, कल्याणमध्ये चांगला उमेदवार मिळतोय, तर त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल, तसंच मी काम करेन. आमचा उद्देश एकच आहे की, 2024 पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, इतका शुद्ध हेतू आमचा आहे. यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही”, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी खदखद व्यक्त केली आहे.

News Title : Video Viral MP Shrikant Shinde check details on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Shrikant Shinde(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x