17 June 2024 8:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

नांदेडच्या सभेत अमित शहांचा जनतेशी संबंधित महागाई-बेरोजगारीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, पण ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना हिंदू-मुस्लिमांवर प्रश्न केले

Union Home Minister Amit Shah

Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये आज जाहीर सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारत चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात की, भारतीय जनता पक्षाने आपलं सरकार पाडलं. पण ते तसं नाहीय. खरा दगा हा तर उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले, असाही घणाघात त्यांनी केला. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून 4 महत्त्वाचे सवाल केले.

२०१४ मध्ये महागाई-बेरोजगारीच्या मुद्द्यांवर मोदी सत्तेत आले होते

नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यापासून देशात महागाई आणि बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. महागाईमुळे लोकांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणार पैसा देखील अपुरा पडत आहे. त्यामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे, तर दुसरीकडे बेरोजगारीने तरुणांवर देखील बिकट काळ ओढवला आहे. मात्र आता २०१४ मध्ये महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सत्तेत विराजमान झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० वर्षात या विषयात नापास झाले आहेत. त्यामुळे जनतेला आणि विरोधकांना केवळ धार्मिक मुद्द्यांवर घेरायचं अशी भाजपाची रणनीती ठरली आहे त्याला देखील अमित शहांच्या प्रश्नावरून दुजोरा मिळला आहे.

अमित शहांची महागाई-बेरोजगारीचे प्रश्न सोडून धार्मिक प्रश्न उपस्थित

कलम 370 हटवलं हे योग्य केलं का नाही? राम मंदिर उभारणी करता ते योग्य करता की नाही? मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही, मुस्लिम आरक्षण पाहिजे का नाही? हेदेखील उद्धव ठाकरे यांनी सांगावं,’ असं अमित शाह म्हणाले. जेवढे प्रश्न उभे केले आहेत, या सगळ्यांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर द्यावीत. दोन दगडांवर पाय ठेवू नयेत, असा निशाणा अमित शाह यांनी साधला. तसंच शिवसेना आम्ही फोडली नाही तर शिवसैनिकांनी फोडल्याचंही अमित शाह म्हणाले.

Latest Marathi News : Union Home Minister Amit Shah rally at Nanded check details on 10 June 2023.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x