15 August 2022 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

हिंदू-मुस्लिम सलोखा वाढला, राम मंदिरासाठी शिया वक्फ बोर्ड अध्यक्षांकडून देणगी

Ayodhya Ram Temple, Supreme Court, Ram Janma Bhumi

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावरील निकालात राम मंदिर उभारणीचा मार्ग खुला केल्याने आता अयोध्येचा संपूर्ण कायापालट करण्याचे येथील प्रशासनाकडून ठरवण्यात आले आहे. त्यासाठी अयोध्येचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यानुसार अयोध्येत पंचतारांकित हॉटेल, रिसॉर्ट, आंतरराष्ट्रीय बस टर्मिनल व विमानतळ या सुविधा करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेश सरकार शरयू नदीतून चालणारे क्रूझ (जहाज सेवा) सुरू करणार आहे.

विकास आराखड्याबाबत अयोध्येचे उपमाहिती संचालक मुरलीधर सिंग यांनी सांगितले की, अयोध्या तीर्थ विकास परिषदेची स्थापना करण्यात येणार असून, अयोध्येचे रूपांतर तिरूपतीसारख्या शहरात करण्यासाठी साधारण चार वर्षे लागणार आहेत. याबाबतचे काम त्वरेने सुरू करण्यात येत असून, अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. एप्रिल २०२०च्या रामनवमीला पहिले विमान उड्डाण येथून होईल, अशी अपेक्षा आहे. अयोध्या रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असून, बस टर्मिनलही सुरू करण्यात येणार आहे. फैजाबाद ते अयोध्या दरम्यान पाच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याची योजना आहे. डिसेंबरमध्ये अयोध्येत पंचतारांकित हॉटेल्स व रिसॉर्ट बांधण्याचे काम सुरू होईल.

दरम्यान, निकालानंतर हिंदू मुस्लिम धर्मियांनी सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court of India) आदर करत सलोखा राखणं सुरूच ठेवल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी गुरूवारी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली. रिझवी यांनी सांगतिले की, बोर्ड मंदिर उभारणीच्यादृष्टीने सकारात्मक आहे. अनेक दशकं चाललेल्या या खटल्यावर अखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. आता भारतात रामजन्मभूमीवर जगातील सर्वात सुंदर मंदिर उभारण्याचे कार्य सुरू होत आहे.

रिझवी म्हणाले की, भगवान राम आपल्या सर्वांचेच पूर्वज आहेत, म्हणूनच रिझवी फिल्मच्यावतीने ५१ हजार रूपयांची भेट रामजन्मभूमी न्यासकडे मंदिर उभारणीसाठी देत आहोत. भविष्यात राम मंदिराची (Ayodhya Ram Tample) उभारणी झाल्यानंतर शिया वक्फ बोर्डाच्यावतीने त्यात देखील मदत केली जाईल, अयोध्येतील राम मंदिर संपूर्ण जगभरासह भारतातील राम भक्तांसाठी गर्वाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)#Supreme Court(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x