11 July 2020 12:53 PM
अँप डाउनलोड

कर्नाटक: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत १५१ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

Congress, BJP, JDS

बंगळूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

परंतु, नुकत्याच राज्यात ४१८ प्रभागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार पडल्या होत्या आणि त्याचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर राज्यात काँग्रेसची हवा असल्याचं स्पष्ट झालं असून, राज्यात आणि केंद्रात सत्ता असून देखील भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. काँग्रेसने ४१८ प्रभागांपैकी सर्वाधिक १५१ जागांवर विजय संपादित करून प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारतीय जनता पक्ष एकूण १२५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

विशेष म्हणजे जनता दल सेक्युलरने एकूण ६३ जागा जिंकल्या आहेत. कर्नाटकातील ९ जिल्ह्यांतील महानगरपालिका आणि नगपालिकांचा समावेश होता. या निकालामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण असून, भाजपाची चिंता वाढली आहे. कारण लवकरच विधानसभेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुका होणार असल्याने त्यावर देखील या निकालांचा परिणाम जाणवणार असं स्थानिक राजकीय मत व्यक्त केली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x