5 May 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' : नरेंद्र मोदी

Narendra Modi, loksabha Election 2019

काशी : मी कधी सुद्धा देशातील गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच संपूर्ण जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. मी गरिबांचे दुखं दूर करण्यासाठी जगतो. माझी फक्त एक जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. त्यामुळे या गरिबीपासून मुक्त होण्याचा संकल्प आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिल्याचे सरकार २-जी घोटाळ्यात व्यस्त होती. परंतु आता ४-जी देशातील गरिबांपर्यंत पोहचलं आहे. आज जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर भारतात केला जातो. पराभवाच्या भितीपोटी महामिलावटी लोकं मला शिव्या देण्याचं काम करत आहेत. परंतु यांच्या शिव्या माझ्यासाठी आर्शीवाद बनला आहे, असं त्यांनी सांगितले.

मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा, स्वत: मतदान करा, इतर लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, पहिल्यांदा मतदान करा आणि नंतर जेवण करा. मतदान केल्यानंतर स्वत:चा सेल्फी समाज माध्यमांवर शेअर करा आणि दुसऱ्या लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केलं. काशीमधील लोकांना मला सांगितलं इथं येऊ नका, आम्ही सांभाळून घेतो. आज प्रत्येक काशीतील रहिवाशी मोदी बनून निवडणूक लढवत आहे. जनसहभागातून काशी विकासाच्या मार्गावर जात आहे. काशीसोबत जोडल्याने मी धन्य झालो. माझं जीवन काशीच्या कामी आलं त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x