
Tata Communications Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या दूरसंचार क्षेत्राशी निगडीत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 9.25 टक्क्यांच्या वाढीसह 1,614.95 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
टाटा समूहाचा भाग असलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 14 टक्क्यांनी वाढली आहे. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,495 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के वाढीसह 1,637.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टाटा कम्युनिकेशन्स कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 18 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी अंतिम लाभांशासाठी बुक क्लोजिंग, रेकॉर्ड डेट आदींची माहिती जाहीर करणार आहे. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 21 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. तज्ज्ञांच्या मते त्याची एक्स डेट 26 जून 2023 रोजी असेल.
टाटा कम्युनिकेशन कंपनीने अपेक्षा व्यक्त केली आहे की, कंपनीचा महसूल FY2027 पर्यंत दुप्पटीने वाढून 28,000 कोटी रुपयेच्या पार जाईल. कंपनीच्या महसुलात YOY 18 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर डिजिटल सेवा महसुलात 35 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तज्ञांनी टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि महसुलात ही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मार्च 2023 तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात 11 टक्के घसरण नोंदवली गेली होती. या तिमाहीत कंपनीने 326.03 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 365.06 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मार्च 2022 च्या तिमाहीत 4,263.03 कंपनीने कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो या तिमाहीत वाढून 4,586.66 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.