15 May 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

हिंदू राष्ट्र झालं आता लोकसभा निवडणुकीपूर्वी 'मुस्लिम मुक्त' उत्तराखंडसाठी महापंचायत, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात वातावरण पेटवलं जातंय?

Uttarkashi Hindu Mahapanchayat

Uttrakhand Politics | लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राज्यांमध्ये हिंदू-मुस्लिम वादाचं विष पेरण्याचे प्रकार जोर धरू लागले आहेत. महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे भाजपच्या मुळाशी येऊ नये म्हणून मतांच्या ध्रुवीकरणातून सत्तेत येण्याच्या योजना अंमलात आणल्या जातं आहेत अशी टीका आता सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यात भाजपाच्या हातात सत्ता आणि प्रशासन आहे अशा राज्यातच हे प्रकार घडत असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. तसेच गोदी मीडिया याच प्रकारणांवरून स्टुडिओत बसून हिंदू-मुस्लिम वातावरण कसं बिघडेल असेच डिबेट्स आणि चर्चा घडवून आणत असल्याने समाज माध्यमांवर भाजपवर जोरदार टीका सुरु झाली आहे. परंतु, भाजपचे हे खेळ आता लोकांना देखील समजू लागले आहेत. त्यामुळे यासाठी समर्थक हिंदुत्ववादी संघटनांना पुढे केलं जातंय. सध्या उत्तराखंड या संघटनांच्या निशाण्यावर आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये तणाव कायम आहे. लव्ह जिहादविरोधात हिंदू समाजाने पुकारलेल्या महापंचायतीवर बंदी असतानाही पुरोळा येथे तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाने कलम १४४ लागू केल्यानंतर शहरात स्मशान शांतता आहे. गुरुवारी सकाळी परिस्थिती ‘लॉकडाऊन’सारखी दिसत होती. सर्व दुकाने बंद होती, त्यामुळे इतर दिवसांप्रमाणे लोक घराबाहेर पडताना दिसले नाहीत. पुरोळ्याचे कॅन्टोन्मेंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. कानाकोपऱ्यात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एक दिवस आधी स्पष्ट केले होते की, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. मात्र यापूर्वी याच ठिकाणी भेट देताना भाजपाचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मुस्लिम विरोधी धार्मिक विधानं केली होती. मात्र आता टीका होऊ लागताच त्यांनी भूमिका बदलली आहे. हाच प्रकार महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घटनेवेळी देखील पाहायला मिळाला होता. जेव्हा दंगेखोर सोडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांवर ‘औरंग्या-औरंग्या’ आणि ‘विशिष्ट समाज-विशिष्ट समाज’ अशा शब्दांवर अधिक जोर देतं होते. पण गुन्हेगार हे गुन्हेगार असतात. कायदा सर्वासाठी समान असतो, पण जाणीवपूर्वक भाजप नेते हिंदू-मुस्लिम करण्यावर जोर देतं होते.

उत्तराखंडमधील प्रकरण काय?
गेल्या महिन्यात एका हिंदू अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेला तणाव कायम आहे. मात्र ज्या दोन मुलांनी (एक हिंदू आणि एक मुस्लिम) या मुलीसोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता ते एक प्रेम प्रकरण होतं. तक्रार दाखल होतंच त्यांना पकडलं गेलं, पण त्यात मुलीने जबाब दिला असून त्यात तिने स्वखुशीने ते केल्याचं म्हटलं आहे. मात्र त्या दोन मित्रांमध्ये एक हिंदू मुलगा आणि मुलीचा जबाब सार्वजनिक होऊ नये म्हणून पत्रकारांना देखील तो जबाब पुरावा देण्यात येतं नाही. हे प्रकरण समजताच या भागात मुस्लिमांविरोधात धमकी देणारे पोस्टर लावण्यात आले होते.

तेव्हापासून मुस्लीम समाजाची दुकाने बंद असून त्यावर काळ्या रंगाच्या निशाणी लावून धमक्या देण्यात आल्या आहेत. ५० वर्षांपासून येथे राहणाऱ्या सुमारे डझनभर मुस्लिम कुटुंबांनी येथून पलायन केलं आहे. आज म्हणजे १५ जून रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने लव्ह जिहादविरोधात महापंचायतीची घोषणा केली होती. त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आणि १९ जूनपर्यंत कलम १४४ लागू केले.

News Title : Before Loksabha Election Purola of Uttarkashi Hindu Mahapanchayat against Muslim check details on 15 June 2023.

हॅशटॅग्स

#Uttarkashi Hindu Mahapanchayat(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x