
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून 52 कोटी रुपये मूल्याची मोठी वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही बातमी पसरताच पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स तेजीत आले.
शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के वाढीसह 580.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीला नुकताच Optronic Periscope पुरवण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून ऑर्डर देण्यात आली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीला ही आंशिक ऑर्डर FY2024 पर्यंत आणि संपूर्ण ऑर्डर FY2025 पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, Paras Technologies कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला CONTROP Precision Technologies कंपनीसोबत एक व्यापारी करार केला आहे.
मागील एका महिन्यात पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी वाढली होती. तर ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीला पारस डिफेन्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, ते लोक सध्या 2 टक्क्यांहून अधिक तोट्यात आहेत. त्याच वेळी , ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी कंपनीचे शेअर्स विकत घेतले, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त 1.78 टक्क्यांनी वाढले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.