18 May 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोनं खरेदीची चांगली संधी, भाव खूप खाली घसरला, जाणून घ्या आजचे नवे दर

Gold Price Today

Gold Price Today | जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त बातमी आहे. आजचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर पाहा. आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,580 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,580 रुपये आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अशा तऱ्हेने सोने खरेदीसाठी हा वीकेंड चांगली संधी आहे. जाणून घ्या या मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे भाव काय आहेत.

मुंबईत सोन्याचा भाव
22 कॅरेट 55,100
24 कॅरेट 60,110

बंगळुरूमध्ये सोन्याचा भाव
22 कॅरेट 55,150
24 कॅरेट 60,160

चेन्नईत सोन्याचा भाव
22 कॅरेट 47,927
24 कॅरेट 52,285

दिल्लीत सोन्याचे दर
22 कॅरेट 55,250
24 कॅरेट 60,260

हैदराबादमध्ये सोन्याचा भाव
22 कॅरेट 55,100
24 कॅरेट 60,110

जाणून घ्या कसे ठरतात सोने-चांदीचे दर

भारतात सोन्या-चांदीचे दर बाजाराच्या ट्रेडिंगनुसार ठरवले जातात, ज्या दिवशी ट्रेडिंग होते त्या दिवसाचा शेवटचा क्लोजिंग हा दुसऱ्या दिवसाचा मार्केट रेट मानला जातो. मात्र, ही केंद्रीय किंमत आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आणखी काही टॅक्ससह दर निश्चित केला जातो आणि मग किरकोळ विक्रेते दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज टाकून त्याची विक्री करतात.

सोन्यात गुंतवणुकीची अजून एक संधी

सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) योजनेअंतर्गत आरबीआय २४ कॅरेट सोन्याचे रोखे जारी करते. या गोल्ड बाँडची किंमत बाजारात मिळणाऱ्या सोन्याएवढी असते. त्यात केलेली गुंतवणूक ८ वर्षांनंतर परत केली जाते. त्यावेळी सोन्याच्या दरानुसार पैसे दिले जातात.

सोन्याच्या गुंतवणुकीवर व्याज मिळणार

त्यामुळे सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे सोन्यात गुंतवणूक करण्यासारखेच आहे. पण इथला अतिरिक्त फायदा म्हणजे दरवर्षी अडीच टक्क्यांइतके व्याजही दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीने सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दरवर्षी 2500 रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजेच 8 वर्षात 20 हजार रुपये व्याज म्हणून मिळतील. याशिवाय बाजारभावाप्रमाणे सोन्याच्या किमतीनुसार पैसे ही परत केले जातील.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 18 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x