25 January 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या
x

Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस?

Graphite India Share Price

Graphite India Share Price | ग्रेफाइट इंडिया या भारतातील ग्रेफाइट इलेक्ट्रोड्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 16.67 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी देखील या स्टॉकमधून चांगली कमाई केली आहे.

स्टीलमधील वाढती मागणी विचारात घेता ब्रोकरेज फर्मने स्टॉक वाढीचा अंदाज व्यक्त केलं आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या कंपनीचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 17 टक्क्यांनी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणाले. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 380.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्रेफाइट इंडियाचे गुंतवणुकदार करोडपती

10 ऑगस्ट 2001 रोजी ग्रेफाइट इंडिया कंपनीचे शेअर्स 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. आता हा स्टॉक 380 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात शेअरची किंमत 10636 टक्क्यांनी वाढली आहे. ग्रेफाइट इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील 22 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.07 कोटी रुपये झाले आहे.

मागील वर्षी 1 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 459.80 रुपये या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होत. सात महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 45 टक्क्यांनी घसरून 251.75 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवर आले होते. आतापर्यंत स्टॉकमध्ये नीचांक पातळीपासून 49 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शेअर मार्केट रिसर्च फर्म ICICI डायरेक्टने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, Graphite India कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 17 टक्क्यांनी वाढू शकतात. आणि 440 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मार्च 2023 तिमाहीमध्ये कंपनीने काही खास कामगिरी केली नाही. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने फक्त 29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत हा निव्वळ नफा 45 टक्के कमी आहे. दुसरीकडे व्यवसाय क्षमतेच्या संदर्भात मार्च 2023 तिमाहीत कंपनीने आपल्या एकत्रित क्षमतेचा वापर 55 टक्के केला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 76 टक्के होता.

स्टीलची मागणी बाजारात वाढत आहे. ग्रेफाइट इलेक्ट्रोडच्या मागणीमध्ये देखील चांगली वाढ पाहायला मिळत आहे. वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या मते, 2023 मध्ये स्टीलची मागणी 2.3 टक्क्यांनी वाढून 1822 दशलक्ष टन पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये स्टीलची मागणी 1.7 टक्के वाढून 1854 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे.

स्टील कंपन्या आता इलेक्ट्रॉनिक आर्क फायनान्स प्रक्रियेकडे वळताना दिसत आहेत. ज्यामुळे दीर्घकालीन ग्रेफाइट इलेक्ट्रोडच्या मागणीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी ग्रेफाइट इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Graphite India Share Price today on 08 June 2023.

हॅशटॅग्स

Graphite India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x