15 May 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Vegetable Markets | आधीचे बुरे दिन बरे होते? अच्छे दिनच्या नादात रोजच्या भाज्या आणि चिकनचे दर सारखेच झाले, महागाई शिगेला पोहोचली

Inflation Effect

Inflation Effect | मागील १० वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात रोज लागणारा भाजीपाला सुद्धा परवडत नाही अशी स्थिती झाली आहे. मिळकत वाढेना आणि महागाई नियंत्रीत होईना अशा दुहेरी कात्रीत सामान्य लोकं अडकली आहेत. २०२४ मध्ये ‘अच्छे दिन आणे वाले है’ असे नारे देत आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचे वचन देतं पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी आता लोकांना ‘बजरंगबली की जय बोलून मतदान करा’ असं भर सभेतून सांगताना महागाईवर एक शब्द देखील बोलताना दिसत नाहीत. त्यात आता इतर नैसर्गिक परिणामांमुळे महागाई अजून वाढली आहे.

वाढत्या तापमानामुळे भाज्यांचे दर वाढत आहेत. यामुळे गृहिणींच्या घराचे बजेट बिघडत आहे. पावसानंतर भाज्यांचे दर आणखी वाढतील, असे मानले जात आहे. सध्या बाजारात भोपळा, लौकी, तोरीचा हंगाम सुरू झाल्यानंतरही या भाज्यांच्या दरात कोणतीही घट झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी टोमॅटो वीस रुपयांना विकला जात होता, पण आज तो तीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींची चिंताही वाढू लागली आहे. काही दिवसांपासून बटाट्याचे दर ठीक होते, पण आता बटाट्याचा भाव वीस रुपयांवर पोहोचल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. बाजारात भोपळ्यासह सर्वच दैनंदिन भाजपचे दर वाढले आहेत.

त्यात मान्सूनने उशीर केल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या आणि त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचं संकट आलेलं आहे. एकूणच पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. नागपुरात तर भाजीपाल्याची किंमत दुप्पटीने वाढली आहे. काही भाज्यांचे आणि मासे-चिकनचे दर जवळपास सारखेच झाले आहेत. त्यामुळे सामान्य लोकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहेत.

नागपुरात भाज्यांच्या दरात दुप्पटीनं वाढ झाली आहे. नागपूरच्या भाजी मार्केटमध्ये सध्या फरसबी 320 किलो रुपयाने विकली जात आहे. सिमला मिर्ची 160 रुपये किलो झाली आहे. किरकोळ बाजारात वांगी 80 रुपये, मेथी 160 रुपये, गवार शेंगा 120 रुपये, भेंडी 80 रुपये, ढेमुस 120 रुपये आणि कोथिंबीर 160 रुपये किलोवर गेली आहे. लांबलेला पाऊस आणि वाढत्या उकाड्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांची दरवाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. बाजारात आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती, भाजी विक्रेते अमित मुळेवार यांनी दिली आहे.

News Title : Inflation Effect in vegetable markets check details on 19 June 2023.

हॅशटॅग्स

#Inflation Effect(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x