20 May 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

Annapurna Swadisht Share Price | अन्नपूर्णा स्वादिष्ट शेअरने 9 महिन्यांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्याहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?

Annapurna Swadisht Share Price

Annapurna Swadisht Share Price| अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचा IPO 9 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. याकाळात अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 68-70 रुपये निश्चित करण्यात आली होती.

अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना शेअर्स 70 रुपये किमतीवर वाटप केले होते. तर या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर 120 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी 251 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 250 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनी IPO तपशील

अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करून एक लॉट खरेदी करण्यासाठी लोकांना 1.40 लाख रुपये काम करावे लागले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना 1 लॉट अंतर्गत 2000 शेअर्स जारी केले होते. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे शेअर्स 70 रुपये किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी 251 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 9 महिन्यांपूर्वी अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या IPO मध्ये 1.40 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.02 लाख रुपये झाले असते.

दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी शेअर्स खरेदी केले

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे 1.25 लाख शेअर्स खरेदी केले होते. शंकर शर्मा यांनी अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे 125000 शेअर्स म्हणजेच जवळपास 1.03 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनी अन्नपूर्णा या स्वतःच्या ब्रँड अंतर्गत स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ बनवण्याचे काम करते.

कंपनीने सुमारे 300 वितरक आणि 80 सुपर वितरकांचे नेटवर्क निर्माण केले आहे. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 277.50 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 124 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Annapurna Swadisht Share Price today on 19 June 2023.

हॅशटॅग्स

Annapurna Swadisht Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x