20 May 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV
x

Viral Video | अमेरिकेत विमानतळावर मोदींच अधिकाऱ्यांकडून स्वागत, नेहरूंच्या स्वागताला राष्ट्राध्यक्ष विमानतळावर हजर असायचे, मार्केटिंगची पोलखोल

Yoga Day

Viral Video | पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळात तिसऱ्यांदा अमेरिकेत दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री ते न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर उतरले. अमेरिकेत त्यांचे भव्य स्वागत केले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. याशिवाय अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करणार असल्यानेही त्यांचा हा दौरा खास आहे. विमानतळावर त्यांचे स्वागत अमेरिका आणि भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी केले. मात्र अमेरिकेत प्रथमच भारताच्या एखाद्या पंतप्रधांना मान मिळतोय असा भ्रम भाजप नेते आणि पदाधिकारी समाज माध्यमांवर अर्धसत्य मांडत आहेत. त्याबद्दल येथे सविस्तर जाणून घेऊया.

भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या विविध पंतप्रधानांनी ३४ वेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. त्यात विद्यमान पंतप्रधान मोदींसह भारताच्या नऊ माजी पंतप्रधानांच्या नावांचा समावेश आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४९ मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी त्यांचे स्वागत केले होते.

पंडित नेहरूंचे तीन वेगवेगळ्या अध्यक्षांनी केले स्वागत
पंडित नेहरू १९४९ मध्ये पहिल्यांदा पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा हॅरी एस. ट्रूमन यांनी त्यांचे स्वागत केले. तो सदिच्छा दौरा होता. त्यावेळी सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. त्याचवेळी भारताने असंलग्नतेचा मार्ग निवडला. सात वर्षांनंतर पंडित नेहरू पुन्हा अमेरिकेत पोहोचले. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डी. आयझेनहॉवर यांनी त्यांचे स्वागत केले होते. १९६१ मध्ये ते तिसऱ्यांदा पाच दिवसांच्या दौऱ्यावर अमेरिकेला पोहोचले होते. त्यावेळी जॉन एफ केनेडी राष्ट्राध्यक्ष होते आणि ते थेट विमानतळावरच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. त्यानंतर उभय देशांमध्ये शिखर बैठक झाली. त्यामुळे सध्या भाजप समाज माध्यमांवर करत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधित चुकीचा आणि अर्धसत्य सांगणारा आहे.

दरम्यान, पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान असताना अमेरिकेतील तत्कालीन राष्ट्राध्यक्ष स्वतः विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी हजर असायचे. सध्याच्या समाज माध्यमांच्या जगात पूर्वीचा भारत आणि त्याचा जगातील मान याची एकच बाजू दाखवली जाते आहे. सध्याच्या तरुणांना तरुणांना पूर्वीच्या भारतातील पंतप्रधानांना जगभरात केवढा मान होता ते दाखवलच जात नाही. त्यामुळेच मोदींना जो मान मिळत आहे तो आधी जगात केव्हाही मिळाला नाही असं चित्र निर्माण केलं जातं आहे.

इंदिरा गांधी यांचे ही अमेरिकेच्या तीन राष्ट्रपतींनी स्वागत केले होते
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेही अमेरिकेच्या तीन वेगवेगळ्या राष्ट्रपतींनी स्वागत केले होते. १९६६ मध्ये त्या अमेरिकेला गेल्या तेव्हा राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन होते. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा अन्नधान्याची मागणी करण्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या, कारण भारतात प्रचंड दुष्काळ पडल्याने सामान्य लोकं आणि शेतकरी चिंतेत होते. त्यावेळी अमेरिकेने भारताला मोठी मदत केली होती. यानंतर १९७१ मध्ये इंदिरा गांधी अमेरिकेत पोहोचल्या तेव्हा रिचर्ड निक्सन राष्ट्राध्यक्ष होते. १९८२ मध्ये इंदिरा गांधी तिसऱ्यांदा अमेरिकेला गेल्या तेव्हा राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी त्यांचे स्वागत केले होते. तेथे त्यांना १९ तोफांची सलामी देण्यात आली होती. त्यामुळे

या पंतप्रधानांशिवाय राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी (चार वेळा), डॉ. मनमोहन सिंग (८ वेळा) अमेरिकेला गेले होते. तर यावेळी जो बायडन पंतप्रधान मोदींचे स्वागत करत आहेत. तर 21 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले होते. 29 सप्टेंबर 2014 रोजी पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अमेरिकेत पोहोचले तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे स्वागत केले होते.

हॅशटॅग्स

#Modi US Visit(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x