27 April 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? शेअरमध्ये चढ-उताराचे चक्र फिरू लागले, शेअर खरेदी करावा?

Suzlon Energy Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात गुंतवणुकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे. मात्र काही दिवसापासून स्टॉकमध्ये किंचित चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 14.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Suzlon Energy Share Price)

13 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 15.76 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 28 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.43 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के (Suzlon Share Price NSE) घसरणीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Share Price BSE)

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मे 2023 पासून नवनवीन ऑर्डर मिळत आहेत. मजबूत ऑर्डर बुकमुळे या कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. FY23 मध्ये सुझलॉन कंपनीचे बाजार भांडवल 1100 कोटी रुपये होते. जवळपास 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच कंपनीच्या सकारात्मक निव्वळ सपत्तीमध्ये वाढ झाली आहे. कंपनीच्या निव्वळ कर्जामध्ये 80 टक्के घट पाहायला मिळाली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने 6 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर मागील आर्थिक वर्षात 166.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने कर्ज कमी करण्याबरोबरच निरोगी ताळेबंद मजबूतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. एमके ग्लोबल फर्मने सांगितले की, पुनर्वित आणि यशस्वी राइट्स इश्यूमुळे सुझलॉन एनर्जी कंपनीचे कर्ज लक्षणीयरीत्या घटले आहेत. याचा फायदा शेअरला होत आहे.

पुढील 2 ते 8 महिन्याच्या कालावधीत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 18-30 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना स्टॉकमध्ये 7.30 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी अक्षय ऊर्जेशी संबंधित व्यवसाय करते. आणि कंपनी पवन ऊर्जा बनवणाऱ्या टर्बाइनची निर्मिती करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x