8 May 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु
x

Blue Star Share Price | ब्लू स्टार शेअर्स गुंतवणुकदारांना 10,855 टक्के परतावा, मोफत बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड फायदा

Blue Star Share Price

Blue Star Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील दोन दिवसापासून जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. या व्यवहारात ब्लू स्टार कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 798.45 रुपये उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. मंगळवारच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये ब्लु स्टार कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्लू स्टार स्टॉकमध्ये इतकी तेजी येण्याचे कारण म्हणजे शेअर काल एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 795.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्स तपशील

ब्लू स्टार कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ असा की कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना रेकॉर्ड तारखेला ब्लू स्टार कंपनीचे मोफत बोनस शेअर्स देणार. ब्लू स्टार कंपनीने या बोनस शेअर्स वाटपासाठी 20 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता.

ब्लू स्टार लाभांश

ब्लू स्टार कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश देण्यासाठी ही ओळखली जाते. या कंपनीने 2022-23 आर्थिक वर्षासाठी प्री-बोनस इश्यूवर अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ब्लू स्टार कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना सुरवातीपासून आतापर्यंत 10,855.62 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2001 मध्ये ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स 7.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 795 रुपये किमतीवर पोहचला आहे. ज्या लोकांनी 21 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपये पेक्षा जास्त झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Blue Star Share Price today on 21 June 2023.

हॅशटॅग्स

Blue Star Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x