18 May 2024 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Reliance Power Share Price | स्वस्त झालेला रिलायन्स पॉवर शेअर अजून तेजीत येणार? एक सकारात्मक बातमी आली, तपशील जाणून घ्या

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने उत्तर प्रदेशातील रोजास्थित रोजा पॉवर कंपनीवर असलेले 925 कोटी रुपयेच्या कर्ज परतफेड केले आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने हे कर्ज फेडण्यासाठी सिंगापूरच्या वर्दे पार्टनर्स निधी स्वीकारला होता. रिलायन्स पॉवर आणि वर्दे पार्टनर्समध्ये मागील वर्षी एक करार करण्यात आला होता. (Reliance Power Share Price Today)

हा करार 1200 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज फेडण्यासाठी होता. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 15.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Power Share Price NSE)

कर्जमुक्त रिलायन्स पॉवर

रिलायन्स पॉवर कंपनीच्या रोजा पॉवर प्लांटमध्ये निर्माण केली जाणारी वीज सध्या दीर्घकालीन वीज खरेदी करार अंतर्गत उत्तर प्रदेश राज्याला पुरवली जाते. पीपीए अंतर्गत रोजा पॉवर प्लांटने उत्तर प्रदेश राज्याला 14 वर्षे वीज पुरवठा करण्याचा करार केला आहे. रोजा पॉवर प्लांटने अडीच वर्षांपूर्वी आपले सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे 925 कोटी रुपयांचे कर्ज मुदतपूर्तीपूर्वी परतफेड केले आहे.

वर्दे पार्टनर्सकडून मिळालेल्या निधीतून रिलायन्स पॉवर कंपनीने आपल्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड केली आहे. उर्वरित निधीचा वापर करून रिलायन्स पॉवर कंपनीने SBI, कॅनरा बँक, येस बँक, आणि अक्सिस बँकेचे कर्ज फेडले आहे. यामुळे रिलायन्स पॉवर कंपनी आता स्वतंत्रपणे कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या सासन पॉवर प्लांटवर भारतीय बँकांचे कर्ज आहे. सासन पॉवर प्लांटवर सरकारी बँकांचे सुमारे 7600 कोटी रुपये कर्ज आहे. सासन पॉवर ही कंपनी मध्यप्रदेशात सासन येथे 4400 मेगावॅट क्षमतेचे एकात्मिक अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट चालवते. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे.

मागील एका महिन्यात 32.61 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 32.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 11.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 15.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Reliance Power Share Price Target 2025)

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 21 June 2023.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x