19 May 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

Nykaa Share Price | नायका शेअरमध्ये तेजी येणार? तज्ज्ञ काय म्हणाले? गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी टार्गेट प्राईस पहा

Nykaa Share Price

Nykaa Share Price | मागील एक वर्षापासून सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन ई-कॉमर्स मार्केटप्लेस नायका कंपनीची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते हा स्टॉक आणखी वाढू शकतो. (Nykaa Fashion)

नायका शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, जेफरीज आणि नौमुरा यांनी नायका कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 152.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते पुढील काळात नायका कंपनीचे शेअर्स 46 टक्केपर्यंत वाढू शकतात.

नायका स्टॉक टार्गेट प्राईस

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने नायका कंपनीचे शेअर्स 210 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या ई-कॉमर्स कंपनीचा पर्सनल केअर व्यवसाय वाढण्याची अपेक्षा आहे. जेफरीजने नायका स्टॉकवर 200 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी सध्या शेअर स्वस्तात उपलब्ध असल्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला आहे.

सौंदर्य आणि पर्सनल केअरमध्ये नायका कंपनीची ऑर्डर बूक मजबूत आहे. कंपनीची ऑर्डर फ्रिक्वेंसी हळूहळू वाढत आहे. ब्रोकरेज फर्म नोमुराने नायका स्टॉकवर 183 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. नायका कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

या कंपनीच्या IPO इश्यूची किंमत 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर शेअरची लिस्टिंग किंमत 2000 रुपयांच्या वर पोहोचली होती. याचा अर्थ लिस्टिंगमध्ये या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. सध्या नायका कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीच्या 72 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price today on 22 June 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x