20 May 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV
x

Jupiter Wagons Share Price | खरेदीला सुपरहिट शेअर! ज्युपिटर वॅगन्स शेअरमध्ये तुफान तेजी, मागील 2 वर्षात 1130% परतावा दिला

Jupiter Wagons Share price

Jupiter Wagons Share Price | ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. 19 जून 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर 13.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 161.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Jupiter Wagons Share Price Today)

मागील 2 वर्षात 1130 टक्के परतावा दिला

यामुळे गुंतवणूकदारांना या काळात 1130 टक्के नफा मिळाला आहे. तीन वर्षांपूर्वी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड या रेल्वे वॅगन निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.30 लाख रुपये झाले आहे. मागील आठ ट्रेडिंग सेशनमध्ये ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 21.24 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 156.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात 206 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 206 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये या स्टॉकची किंमत 64 टक्के वाढली आहे. तर या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6263 कोटी रुपये आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 जून 2023 रोजी 161.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते 21 जून 2022 रोजी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 45.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरचा प्रवास आणि कंपनीची आर्थिक कामगिरी

ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 79.2 अंकावर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ हा स्टॉक ओव्हर बॉट झाला आहे.ज्युपिटर वॅगन्स स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1 आहे, जो या कालावधीतील सरासरी अस्थिरतेचे निर्देशक आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे.

मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने 14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 184.18 टक्के वाढीसह 39.21 कोटीवर पोहचला आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीची सेल्स 96 टक्के वाढीसह 712 कोटी रुपयेवर पोहचली आहे.

मार्च 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा सेल्स 363 कोटी रुपये होता. तिमाही दर तिमाही आधारावर, मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 12 टक्के घसरण झाली, आणि कंपनीने 44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीची विक्री 10.27 टक्के वाढीसह 646 कोटी रुपयेवर पोहचली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jupiter Wagons Share price today on 22 June 2023.

हॅशटॅग्स

Jupiter Wagons Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x