Lok Sabha Election 2024 | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाटणा येथे विरोधकांच्या बैठकीपूर्वी अल्टिमेटम दिला होता, त्यांना काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. या अध्यादेशावर काँग्रेसने भूमिका जाहीर न केल्याने पाटणा येथील विरोधकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला असताना आम आदमी पक्षाला काँग्रेसने सध्या थांबण्यास सांगितले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘हो किंवा नाही’ असे उत्तर देण्याचे टाळले असून, संसदेच्या अधिवेशनात यावर पक्ष निर्णय घेईल, असे सांगितले आहे. खर्गे यांच्या उत्तरानंतर आता केजरीवाल काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीतून निघताना खर्गे म्हणाले की, अध्यादेशाचे समर्थन किंवा विरोध करण्याचा निर्णय बाहेर घेतला जात नाही. ते म्हणाले की, संसदेच्या अधिवेशनात सर्व पक्ष मिळून अजेंडा ठरवतील. भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी ही बैठक असल्याचेही ते म्हणाले. या भाजप सरकारला एकत्र आणून पदच्युत करण्याचा आमचा अजेंडा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यासाठी आम्ही आधीही प्रयत्न करत आलो आहोत. राहुल गांधींनी याची सुरुवात केली, त्याचाच एक भाग म्हणजे आम्ही पुन्हा एकदा पाटण्यात भेटत आहोत.

काँग्रेसने अध्यादेशाला पाठिंबा दिला नाही तर आपण बाहेर पडू, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे का, असे विचारले असता खर्गे म्हणाले, ‘अध्यादेशाचे समर्थन किंवा विरोध करण्याचा निर्णय बाहेर घेतला जात नाही, तो संसदेत होतो, हे कदाचित त्यांनाच ठाऊक असेल. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर त्यापूर्वी नेहमी अजेंडा ठरवणारे, कुणाला पाठिंबा द्यायचा, कोणाला स्वीकारायचा हे सर्व पक्षांचे लोक ठरवतील. त्यांच्या पक्षाचे नेतेही सर्वपक्षीय बैठकांना हजेरी लावतात. पण त्यांना कसली प्रसिद्धी आणि घाई झाली आहे ते आपण बघू, असं ते म्हणाले. सभागृहात कशाला विरोध करायचा, काय स्वीकारायचा हे १५-२० पक्ष मिळून ठरवतात. आता बोलण्यापेक्षा संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर निर्णय घेऊ असं खर्गे म्हणाले.

News Title : Lok Sabha Election 2024 Patna Meeting check details on 23 June 2023.

Lok Sabha Election 2024 | ही बैठक विरोधकांच्या एकजुटीची आहे, तुमच्यासाठी नाही, कोणते निर्णय कुठे घेतात हे समजून घ्या, काँग्रेसने झापले