 
						Equitas Small Finance Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. तर आज हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी हा स्टॉक ट्रेडिंग दरम्यान 4 टक्के घसरणीसह 81.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर दिवसा अखेर स्टॉक 3.04 टक्के घसरणीसह 82.18 रुपये किमतीवर बंद झाला होता. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी इक्विटास स्मॉल फायनान्स स्टॉक 2.50 टक्के वाढीसह 84.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Equitas Small Finance Bank Share)
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने इक्विटास स्मॉल फायनान्स बँक स्टॉकमध्ये तेजी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने मजबूत वाढ आणि मजबूत नेट-टर्म अप-साइड संभाव्यतेमुळे इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
RBI चा निर्णय
नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने PN वासुदेवन यांची इक्विटास स्मॉल फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. MD आणि CEO म्हणून वासुदेवन यांचा सध्याचा कार्यकाळ 22 जुलै 2023 रोजी पूर्ण होणार आहे. मे 2023 मध्ये वासुदेवन यांनी त्यांच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कल्याणकारी उपक्रमांच्या कामातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
शेअरची लक्ष्य किंमत
ब्रोकरेज फर्मच्या मते इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स पुढील काळात 105 रुपयेपर्यंत वाढू शकतात. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शेअरच्या किमतीत 28 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील तीन महिन्यांत या बँकेच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 113.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष 2023 मधील मार्च तिमाहीत 58 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		