3 May 2025 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग झाली, आता शेअर पुन्हा तेजीत येणार? शेअरची कामगिरी जाणून घ्या

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये काल जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. एका दिवसात रिलायन्स पॉवर स्टॉक 4.41 टक्के घसरणीसह 14.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसांपासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र काल शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.71 टक्के वाढीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Reliance Power Share Price Today)

मागील एका वर्षभरात रिलायन्स पॉवर या कर्जबाजारी वीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 20.34 टक्के वाढली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या कर्जदात्यांनी लोन स्वॅप स्कीमसाठी SBI कॅप्स कंपनीला सल्लागार जबाबदारी दिली आहे. सल्लागार म्हणून SBI Caps कंपनी VIPL च्या थकित कर्जाच्या निरकरणासाठी वन टाईम रिझोल्यूशन बोली मागविणार आहे. याशिवाय ते प्राइम बिडरच्या निवडीशी संबंधित मापदंड आणि सूचनाचे निर्धारण करण्याचे काम करेल.

VIPL कंपनीवर तब्बल 2,000 कोटी रुपयेचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी SBI Caps कंपनी योग्य आणि पारदर्शक प्रक्रियेचे निर्धारण करून त्याची अंमलबजावणी करेल. या योजनेची पूर्ती करण्यासाठी SBI कॅप कंपनीला 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एकेकाळी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 275 रुपयेवर ट्रेड करत होते.

2008 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 275 रुपयेवर ट्रेड करत होते. त्यानंतर या शेअरची किंमत 95 टक्के खाली आली होती. YTD आधारे रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3.40 कमजोर झाले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 55.63 टक्के कमजोर झाले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 24.95 रुपये होती. रिलायन्स पॉवर कंपनीचे बाजार भांडवल 5,285.32 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 27 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या