 
						Predator Drones Deal | अमेरिकेकडून प्रिडेटर ड्रोन खरेदीवरून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. काँग्रेस मीडिया सेलचे प्रभारी पवन खेरा यांनी बुधवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ड्रोनच्या किंमती आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकी शिवाय हा करार मंजूर करण्यावर प्रश्न उपस्थित केले.
राफेल कराराची पुनरावृत्ती
पवन खेरा म्हणाले की, राफेल करारात जे घडले त्याची पुनरावृत्ती प्रिडेटर ड्रोन खरेदीत केली जात आहे. उर्वरित जग म्हणजे इतर देश हे तंत्रज्ञान आऊट डेटेड असल्याने चारपट कमी किमतीत खरेदी करत असताना हेच प्रिडेटर ड्रोन मोदी सरकार चौपटीने अधिक किंमतीत विकत घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 15 जून 2023 रोजी संरक्षण कराराला मंजुरी देण्यात आली होती.
मोदी सरकार २५ हजार कोटी रुपयांना खरेदी करणार
राफेल करारात जे घडले त्याची पुनरावृत्ती अमेरिकेसोबतच्या प्रिडेटर ड्रोन व्यवहारात होत आहे. हेच ड्रोन इतर देश चौपट किमतीपेक्षा कमी किमतीत विकत घेत आहेत, पण भारत ३१ प्रीडेटर ड्रोन ३ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच २५ हजार कोटी रुपयांना खरेदी करत आहे. आम्ही ८८० कोटी रुपयांना एक ड्रोन विकत घेत आहोत.
देशात ‘मेक इन इंडिया’ आणि परदेशात भलतंच
मोदी सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर आणि इतर देशांकडून ड्रोन खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खेरा म्हणाले, ‘मेक इन इंडिया कुठे गेला? ‘रुस्तम आणि घातक’ सारख्या ड्रोनच्या विकासासाठी आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) 1786 कोटी रुपये मंजूर केले होते. मग ड्रोन खरेदी करण्यासाठी तुम्ही अमेरिकेला २५ हजार कोटी रुपये का दिले?
जुने तंत्रज्ञान आणि टाकाऊ तंत्रज्ञान (अमेरिकेच्या स्टोअरमध्ये पडून)
मोदी सरकारवर निशाणा साधताना खेरा यांनी ड्रोन हे अमेरिकेचे जुने तंत्रज्ञान आणि टाकाऊ तंत्रज्ञान (अमेरिकेच्या स्टोअरमध्ये पडून) असल्याचे सांगत म्हटले की, जेव्हा आपण एखादी निरुपयोगी वस्तू (आऊट डेटेड) विकत घेतो, तेव्हा ते मूळ किमतीपेक्षा अधिक किंमतीत कसे विकत घेऊ शकतो? या ड्रोनच्या खरेदीत पेगॅसससाठी काही इलेक्टोरल बॉण्ड किंवा कॉम्प्लिमेंटरी डील आहे का?
कभी इतना महंगा डिनर किया है, जिसमें देश को 25 हजार करोड़ देने पड़ जाएं!
एक फिल्म बनी थी- “हम आपके हैं कौन”, अब एक नई फिल्म बन रही है- “हम आपके हैं ड्रोन”, जिसके हीरो हैं नरेंद्र मोदी।
आखिर कौन हैं वो ड्रोनाचार्य, जो इस फिल्म का निर्देशन कर रहा है?
: @Pawankhera जी pic.twitter.com/OUEyY8UHwi
— Congress (@INCIndia) June 28, 2023
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		