 
						WS Industries Share Price | डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 496.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीने सेबीला 380 कोटी रुपये मूल्याची नवीन वर्क ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली आहे. मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीला अल्पावधीत 3 नवीन वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत.
डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीला CMK Projects Private Limited कंपनीकडून एक ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या बांधकामाचा समावेश आहे. ऑर्दरचे मूल्य 67 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 99.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ऑर्डर तपशील :
WS इंडस्ट्रीज कंपनीला 60 कोटी रुपये मूल्याची दुसरी ऑर्डर देखील इंटिग्रेटेड स्टॉर्म वॉटर ड्रेन कामा संबंधित आहे. तर तिसरी ऑर्डरमध्ये डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीला एकात्मिक बस टर्मिनल आणि बहु-उपयोगी सुविधा बांधण्याचे कंत्राट दिले आहे. या ऑर्डरचे मूल्य 253 कोटी रुपये आहे.
तामिळनाडूस्थित डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवू शकतात. डब्ल्यू एस इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना खूप कमी काळात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जुलै 2022 पासून आतापर्यंत डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 रुपये वरून 101 रुपयेवर पोहचले आहेत.
1 वर्षात 656.11 टक्के परतावा :
डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 656.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 287 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी डब्ल्यूएस इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 15 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 99 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही 2 जानेवारी रोजी या स्टॉकवर एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य सात लाख रुपये झाले असते.
मागील बुधवारी WS इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 100 रुपयेवर ट्रेड करत होते. WS इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 103 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 13 रुपये होती. डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 421 कोटी रुपये आहे. मार्च तिमाहीत कंपनीने ऑपरेटिंग महसूल आणि नफ्यात उत्कृष्ट वाढ नोंदवली आहे. आणि तज्ञांनी गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		