14 December 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Hardwyn Share Price | हार्डविन इंडियाचा शेअर पैसे वेगाने वाढवतोय, एका वर्षात 179.31 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?

Hardwyn Share Price

Hardwyn Share Price | 13 एप्रिल 2022 रोजी हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 40 रुपयेच्या पार गेला आहे. हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 41.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

हार्डविन इंडिया स्टॉकमधील अचानक तेजीचे कारण म्हणजे, हार्डविन इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनी सोबतच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. मागील शुक्रवारी आणि आज देखील हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी खरेदी पाहायला मिळाली आहे. मार्च तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 30 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात वर्ष-दर-वर्ष आधारावर 10 टक्के घट पाहायला मिळाली आहे.

मार्च 2023 तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 5.66 कोटी रुपये नफा कमावला होता, ज्यात 118 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीने मागील एक-दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे.

20 जून 2022 रोजी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 179.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांच्या कालावधीत, हार्डविन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

हार्डविन इंडिया ही कंपनी मुख्यतः हार्डवेअर फिटिंग मॅन्युफॅक्चरिंग संबंधित व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी बिल्डरला संपूर्ण समाधान सेवा प्रदान करण्याचे काम करते. तसेच हार्डविन इंडिया ही कंपनी किचन प्रॉडक्ट्स, मल्टी प्रॉडक्ट्स आणि टेक्सटाइल्स संबंधित च्या व्यवसाय ही करते. YTD आधारे हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 22.45 टक्के मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hardwyn Share Price today on 03 July 2023.

हॅशटॅग्स

Hardwyn Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x