26 April 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Shera Energy IPO | आला रे आला IPO आला! नवीन कंपनीचा IPO लाँच होतोय, सुरुवातीलाच कमाईची संधी, डिटेल्स पहा

Shera Energy IPO

Shera Energy IPO | 2023 या नवीन वर्षात आयपीओ मार्केट शांत-शांत पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरली आहे, आणि त्यामुळे नकारात्मक वातावरणात कंपन्या आयपीओ लॉन्च करण्याची जोखीम घेणे टाळत आहेत. मात्र अशी एक कंपनी आहे, जिने आपला आयपीओ लाँच करण्याची तयारी केली आहे. ‘शेरा एनर्जी’ या कंपनीचा आयपीओ 7 फेब्रुवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shera Energy Share Price | Shera Energy Stock Price)

आयपीओ प्राइस बँड आणि लॉट साइज :
‘शेरा एनर्जी’ कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 55-57 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. तर एका लॉटमध्ये कंपनी 2000 शेअर्स जारी करणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 2000 शेअर्स खरेदी करावे लागतील. आणि त्यासाठी किमान 1,14,000 रुपये खर्च येईल. या कंपनीचे शेअर्स ‘NSE Emerge’ निर्देशांकावर सूचीबद्ध होतील. कंपनी या आयपीओच्या मध्मातून 35.20 कोटी रुपये भांडवल जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. IPO अंतर्गत कंपनी 5.97 कोटी नवीन शेअर्स जारी करेल. त्याच वेळी कंपनीचे विद्यमान प्रवर्तक 29.23 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खुल्या बाजारात विकतील.

कंपनीची आर्थिक बाजू :
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 523.82 कोटी रुपये कमाई केली होती. तर त्यात कंपनीला एकूण सात कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने 338.72 कोटी रुपये महसूल संकलन केला होता. यापैकी 4.28 टक्के निव्वळ प्रॉफिट प्रवर्तकांचे होते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘शेरा एनर्जी’ कंपनी मुख्यतः विंडिंग वायर आणि स्ट्रिप्स बनवण्याचे काम करते. विंडिंग वायर आणि स्ट्रिप्स बनवण्यासाठी तारा आणि पट्ट्या नॉन-फेरस धातूचा वापर केला जातो. कंपनी आपल्या ग्राहकांच्या आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार विविध आकाराचे वायर, ट्यूब आणि रॉड बनवण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shera Energy IPO stock market GMP on 06 February 2023.

हॅशटॅग्स

Shera Energy IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x