 
						Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1076.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 19.02 टक्के वाढीसह 1,243.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Olectra Share Price)
स्टॉकवाढीचे कारण :
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे.ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला तब्बल 1000 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला 550 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून 550 इलेक्ट्रिक बस पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला ही ऑर्डर पुढील 16 महिन्यांत पूर्ण करायची आहे. 500 बसेस इंटर सिटी आणि 50 बसेस इंट्रा सिटी कामकाजासाठी वापरले जाणार आहे.
3 वर्षात 1700 टक्के परतावा :
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1700 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 6 नोव्हेंबर 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 59.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 6 जुलै 2023 रोजी 1076.65 रुपये किमतीवर पोहोचले होते. जर तुम्ही 6 नोव्हेंबर 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 18.21 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		