14 February 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

RPP Infra Share Price | RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स शेअरने एका दिवसात 14 टक्के परतावा दिला, नेमकं कारण काय? डिटेल्स जाणून घ्या

RPP Infra Share Price

RPP Infra Share Price | RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढीसह 66.07 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजीचे कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 289.30 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली आहे. (RPP Share Price)

RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीला तामिळनाडूमध्ये 125.85 कोटी रुपये मूल्याचे फ्लायओव्हर प्रकल्प आणि EPC आधारावर 41.15 कोटी रुपये सुशोभीकरणाचे काम मदुराई शहर महानगरपालिकेकडून प्राप्त झाले आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के घसरणीसह 62.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीला मिळालेल्या 3,240 कोटी रुपये ऑर्डर्सपैकी पाणी पुरवठा वितरक प्रणालीचे अपग्रेडेशन आणि होम सर्व्हिस कनेक्शन देण्यासाठी विविध नगर पंचायतींकडून 122.3 कोटी रुपये किमतीचे ऑर्डर्स मिळाले आहे. 30 जून 2023 रोजी RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीचे ऑर्डर बुकचे एकूण मूल्य 3,240 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील सहा महिन्यात RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने लोकांना 46.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 73.13 टक्के वाढली आहे.

ट्रेंडलाइन डेटानुसार तांत्रिक आघाडीवर RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीच्या स्टॉकची किंमत 82.6 टक्के मजबूत झाली आहे. तर मागील वर्षी कंपनीची क्षेत्रीय वाढ 28.2 टक्के नोंदवली गेली आहे. इक्विटी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्हज फर्म एंजेल वन च्या तज्ज्ञांच्या मते RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स स्टॉकमध्ये मजबूत गॅप अप ओपनिंग पहायला मिळत होती. सुरुवातीच्या काही व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये 14 टक्के वाढीसह मजबूत व्हॉल्यूम पाहायला मिळत होती. तज्ञांच्या मते पुढील काळात RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवर पोहोचतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RPP Infra Share Price today on 07 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RPP Infra Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x