15 May 2024 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर, कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीने यवतमाळ भगवामय, राठोडांचा करेक्ट कार्यक्रम होणार

Uddhav Thackeray

Uddhav Thackreay | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज, रविवारपासून दोन दिवसांचा झंझावाती विदर्भ दौरा करणार असून या दौऱ्यात ते विदर्भातील पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ते विदर्भात यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड यांचा देखील आगामी निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचं म्हटलं जातंय.

पोहरादेवीच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात
बंजारा समाजाची काशी अशी ख्याती असलेल्या यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस येथील पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. दुपारी दोन वाजता ते दारव्हा-दिग्रस येथे दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडण्यात आला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा संवाद दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

उद्धव ठाकरेंचा आजचा कार्यक्रम कसा असेल :
* दुपारी 2 वा.2 पोहरादेवी दर्शन
* दुपारी 3 वा. यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
* दुपारी 3.30 वा. वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा.
* सायंकाळी 4 वा. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद.

News Title : Uddhav Thackeray on Vidarbh Visit Yavatmal Rally check details on 09 July 2023.

हॅशटॅग्स

Uddhav Thackeray(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x