 
						EIL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, इंजिनियर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 121 रुपये किमतीची ट्रेड करत होते. तर इंजिनियर्स इंडिया कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी 124 रुपये ही आपली उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर 1.19 टक्के घसरणीसह 120.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. कारण या कंपनीची ऑर्डर बुक मूल्य 6100 कोटींवर पोहोचले आहे. इंजिनियर्स इंडिया कंपनीला हायड्रो इलेक्ट्रिक सेगमेंटमधून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीच्या ऑर्डर बूकमध्ये इन्फ्रा, मेटल आणि पॉवर सेक्टरचा वाटा खूप कमी आहे.
सिव्हिल कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये कंपनीची मजबूत उपस्थिती पाहता, गुंतवणूकदार शेअरवर मोठ्या प्रमाणात पैसे लावत आहेत. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी जलविद्युत प्रकल्प बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. देशातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा विकास करण्यात इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे मोठे योगदान आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 121 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 125 रुपये किमतीवर पोहचला होता. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आज विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. मात्र पुढील काळात हा स्टॉक जबरदस्त कमाई करून देऊ शकतो.
गेल्या 5 दिवसात, या कंपनीच्या शेअरने लोकांना , इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना 4.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवार दिनांक 15 जून 2023 रोजी इंजिनियर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 108 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.36 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		