
Patel Engineering Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी पटेल इंजिनीअरिंग कंपनीमध्ये आपली गुंतवणुक वाढवली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 40 रुपयेपेक्षा कमी आहे. विजय केडीया यांनी एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे अतिरिक्त 30 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
Q1 FY23 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार विजय केडिया त्यांच्या Kedia Securities Pvt Ltd कंपनीने पटेल इंजिनीअरिंग कंपनीमधील आपले भाग भांडवल 1.29 टक्क्यांवरून वाढवून 1.68 टक्के केले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 39.49 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 41.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विजय केडिया यांची गुंतवणूक :
एप्रिल ते जून 2023 या तिमाहीपर्यंत पटेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये विजय केडिया यांनी 1.30 कोटी शेअर्स धारण केले होते. याचे एकूण प्रमाण 1.68 टक्के आहे. विजय केडिया यांनी जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीपर्यंत पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे 1 कोटी शेअर्स धारण केले होते. हे एकूण भाग भांडवलाच्या 1.29 टक्के आहे. याचा अर्थ असा की, विजय केडिया यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पटेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करून अतिरिक्त 30 लाख शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले आहेत.
सेबीच्या नियमांनुसार एखाद्या सूचीबद्ध कंपनीमध्ये जेव्हा गुंतवणुकदार 1 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भांडवल धारण करत असतात, असा सर्व वैयक्तिक शेअर धारकांची नावे शेअर होल्डरच्या यादीत जाहीर करावे लागतात. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षात जोरदार वाढ झाली आहे. मार्च 2023 अखेर स्मॉल या कंपनीचे शेअर्स 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 39.49 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.