12 December 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Deepak Chemtex IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! किंमत 76 रुपये, शेअर पहिल्याच दिवशी देईल 40 टक्के परतावा

Deepak Chemtex IPO

Deepak Chemtex IPO | दीपक केमटेक्स कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दीपक केमटेक्स कंपनीचा IPO 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर दीपक केमटेक्स IPO मध्ये पैसे लावा. आयपीओ ओपनिंगच्या दुसऱ्याच दिवशी दीपक केमटेक्स IPO 80 पट अधिक भरला आहे. आज या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा आयपीओ बंद होईल.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, दीपक केमटेक्स कंपनीचे शेअर्स 40 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, दीपक केमटेक्स कंपनीचे शेअर्स 112 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 76-80 रुपये निश्चित केली होती.

सध्या ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 32 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर या कंपनीचे शेअर्स 80 रुपये या अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले तर, दीपक केमटेक्स कंपनीचे शेअर्स 112 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 40 टक्के नफा मिळू शकतो. दीपक केमटेक्स कंपनी आपल्या IPO मधील गुंतवणुकदारांना 6 डिसेंबर 2023 रोजी शेअर्स वाटप करेल. आणि 11 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक सूचीबद्ध केला जाईल.

दीपक केमटेक्स कंपनीच्या IPO ला एकूण 88 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 125.43 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 105.49 पट अधिक खरेदी करण्यात आला आहे.

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 10.95 पट अधिक सबस्क्राइब करण्यात आला आहे. दीपक केमटेक्स IPO 1 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. आयपीओ पूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकानी 99.40 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर IPO नंतर हे प्रमाण 73.05 टक्केवर येईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deepak Chemtex IPO GMP Today 01 December 2023.

हॅशटॅग्स

Deepak Chemtex IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x