18 May 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?
x

HIM Teknoforge Share Price | जोरदार कमाई होतेय, या शेअरने फक्त 1 महिन्यात 51 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घेणार?

HIM Teknoforge Share Price

HIM Teknoforge Share Price | एचआयएम टेक्नोफोर्ज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 176 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या रेअर एंटरप्रायझेस कंपनीने 96.3 लाख रुपये मूल्याच्या ब्लॉक डील अंतर्गत एचआयएम टेक्नोफोर्ज या ऑटो उपकंपनीमधील 1 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. त्यामुळे एचआयएम टेक्नोफोर्ज स्टॉक तेजीत वाढत आहे. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी एचआयएम टेक्नोफोर्ज स्टॉक 3.38 टक्के वाढीसह 181.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेअर एंटरप्रायजेस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रेअर एंटरप्रायझेस किंवा झुनझुनवाला कुटुंबातील इतर कोणत्याही ग्रुप फर्मसोबत काहीही संबंध नाही. ही माहिती BSE च्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित झाल्यावर Rare Enterprise कंपनीने एचआयएम टेक्नोफोर्ज कंपनीचे 90,006 इक्विटी शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी ब्लॉक डील अंतर्गत 107 रुपये किमतीवर खरेदी केले. या गुंतवणुकीसाठी रेअर एंटरप्रायजेस कंपनीने 96.3 लाख रुपये खर्च केले आहेत.

एचआयएम टेक्नोफोर्ज कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 51.3 टक्के मजबूत झाले आहेत. एचआयएम टेक्नोफोर्ज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 137 कोटी रुपये आहे.

एचआयएम टेक्नोफोर्ज ही कंपनी विविध दर्जेदार फोर्जिंग्ज आणि घटक जसे की गीअर्स एक्सेल आणि दुरुस्ती किट बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1973 साली झाली होती. ही कंपनी ऑटोमोटिव्ह, नॉन-ऑटोमोटिव्ह आणि अभियांत्रिकी घटकांचे उत्पादन, विक्री, वितरक आणि विपणन या व्यवसायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HIM Teknoforge Share Price NSE 01 December 2023.

हॅशटॅग्स

HIM Teknoforge Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x