
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14.95 टक्के वाढीसह 488.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार झेन टेक्नॉलॉजी कंपनीला एक महत्त्वपूर्ण ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 340 कोटी रुपये आहे.
झेन टेक्नॉलॉजी कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी ड्रोन बनवण्याच्या व्यवसाय गुंतलेली आहे. पुढील काळात कंपनीला आणखी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात 7 जुलै रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 160 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली होती. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 576.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
झेन टेक्नॉलॉजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना मिळाले ऑर्डर भारत सरकारच्या स्वदेशी डिझाइन आणि विकास उपक्रमांतर्गत प्रोत्साहित आहेत. या कार्यक्रमात उत्पादनात भारतीय IP आणि 60 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री असलेले साधन वापरणे आवश्यक आहे. झेन टेक कंपनीने तीन दशकांपेक्षा जास्त IP- आधारित डिझाइन आणि विकास अनुभव असलेली कंपनी असून स्वदेशी उपक्रमांचा फायदा घेण्यास सज्ज आहे.
जून 2023 मध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 202 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली होती. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने YTD आधारे आपल्या गुंतवणूकदारांना 208.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 566.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. कंपनीच्या स्टॉकचे P / E गुणोत्तर 94.88 टक्के आहे. तर बूक व्हॅल्यू किंमत 11.19 आहे. स्टॉकचा एक वर्षांचा बीटा 0.81 आहे, वरून कळते की स्टॉकमध्ये अस्थिरता कमी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.