 
						Dhruv Consultancy Share Price | शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. अशा वेळी गुंतवणुकदार पैसे लावण्यासाठी मजबूत शेअर शोधत आहेत. मात्र चांगला स्टॉक शोधणे सोपे काम नाही. आम्ही तुमचे काम सोपे करतो. आज या लेखात आपण असा स्टॉक पाहणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. (Dhruv Share Price)
गुंतवणूकदारांना 215 टक्के परतावा दिला
या स्टॉकचे नाव आहे, ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. मागील 3 वर्षांत ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 50.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 242 कोटी रुपये
ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आपल्या ग्राहकांना पायाभूत सुविधा प्रदान करण्याचे काम करते. नुकताच ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीला गाझीपूर-बलिया या चौपदरी रस्त्यासंबंधित सल्लागार सेवा देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट ईपीसी मोडवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे. ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीला या कामासाठी 10 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 13 कोटी रुपये मूल्याच्या विविध ऑर्डर देण्यात प्राप्त झाल्या आहेत. ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 242 कोटी रुपये आहे. ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीने मागील आर्थिक वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सेल्समध्ये 4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती, तर कंपनीच्या नफ्यात 127 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
मागील आर्थिक वर्षात ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीच्या सेल्समध्ये आठ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. याकाळात कंपनीने 5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीच्या शेअर्सनी 50 रुपये किंमत स्पर्श केली होती. ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 72.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 43.26 रुपये होती.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21.68 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 3.56 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		