10 May 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार
x

सतर्क राहा! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा-बालाकोट 2 आणि अयोध्या-काशी-मथुरेतील मंदिरावर हल्ला घडवून आणण्याची तयारी सुरु आहे

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांनी 2024 मध्ये पुलवामा आणि बालाकोटसारखे काही घडू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर अयोध्येच्या राम मंदिरावर किंवा देशातील कोणत्याही प्रसिद्ध मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल अशी त्यांनी धक्कादायक माहिती उपस्थितांना संबोधित करताना दिली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हल्ल्यासाठी काही सैनिकही पाठवले जाऊ शकतात. हाच प्रकार 2019 मध्ये एअर स्ट्राईकच्या रूपात झाला होता आणि तोच मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने वापरला होता याची देखील त्यांनी आठवण करून दिली.

बीएसएफचे माजी एडीजी आणि सुरक्षा तज्ज्ञ एस. के. सूद काय म्हणाले?

बीएसएफचे माजी एडीजी आणि सुरक्षा तज्ज्ञ एस. के. सूद म्हणाले, ‘२०२४ पूर्वी ‘गजवा-ए-हिंद’सारख्या दहशतवादी संघटना ‘राम’ मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे लक्षात घेता काशी, मथुरा आणि अयोध्येतील मंदिरांची सुरक्षा तीन पटीने वाढवावी. पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफ हल्ल्याबाबत ते म्हणाले, ‘सरकारला हे प्रकरण गुप्त ठेवायचे आहे.

देशाच्या सैनिकांना अशा वाहनातून धाडण्यात आलं जे वाहन दगडाच्या माऱ्यापासूनही बचाव करू शकत नव्हतं. CRPF जवानांच्या घटनेत ज्या लोकांनी चूक केली होती, त्यांना वाढती देण्यात आली यातून बरंच काही सिद्ध होतं असं देखील ते म्हणाले. त्यामुळेच आजपर्यंत देशाला हे कळलंच नाही की ते ३०० किलो RDX आलं कुठून आणि ते या मार्गावर कोणी पाठवलं होतं. केंद्र सरकारने ते सर्वकाही शेवटपर्यंत गुपित ठेवलं आहे याची देखील त्यांनी आठवण करून दिली.

ज्यांना शिक्षा व्हायला हवी होती, त्यांना मोदी सरकारने बक्षिसे का दिली?

मंगळवारी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा विषय, चिंता आणि उत्तरदायित्व’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशांत भूषण, एस. के. सूद यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी परिषदेत आपली मते मांडली. यावेळी प्रशांत भूषण म्हणाले, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबाबत अनेक प्रश्न आजही कायम आहेत. तो हल्ला कसा झाला, का झाला याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे गुप्तचर यंत्रणेचा इशारा असतानाही सैनिकांना रस्त्याने का पाठवण्यात आले. त्यांना विमानाने का नेण्यात आले नाही? पुलवामा हल्ल्याच्या एक महिन्यापूर्वी ११ गुप्तचर माहिती मिळाली होती, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. सुरक्षा दलांसाठी ठरवून दिलेल्या ‘एसओपी’चे पालन झाले नाही. बरोबर त्याच मार्गावर तीनशे किलोहून अधिक आरडीएक्स घेऊन गाडी फिरत राहिली, पण कुणालाच कळले नाही हे मोठं गुपित आहे. कारण CRPF जवानांना याच मार्गाने आता वाहनाने पाठवलं जाणार आहे हे हल्ला करणाऱ्यांना आधीच माहिती होतं का? असं देखील यातून दिसून येतंय.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा उल्लेख करताना प्रशांत भूषण म्हणाले की, केंद्र सरकारने त्यांना गप्प राहण्यास सांगितले. चाळीस जवान शहीद झाले आहेत. आतापर्यंत त्या प्रकरणाचा कोणताही तपास अहवाल आला आहे, हे कोणालाही माहित नाही. तो अहवाल आली असेल तर त्यात काय आहे? याबद्दल कोणालाच माहिती नाही. त्यावर मोदी सरकारने सभागृहात किंवा सार्वजनिक स्वरूपात चर्चाच केली नाही. जेव्हा हे सर्व घडले तेव्हा कोणाचीही जबाबदारी निश्चित होऊ शकली नाही. ज्यांना शिक्षा व्हायला हवी होती त्यांना पदोन्नतीच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आले हे काय सांगून जातंय?

आरडीएक्स घेऊन जाणाऱ्या गाडीबद्दल माहिती होती

बीएसएफचे माजी एडीजी एस. के. सूद म्हणाले की, 2024 पूर्वी राम मंदिरावर हल्ला होऊ शकतो असे ऐकले जात आहे. इतर शहरांतील मंदिरेही धोक्यात आली आहेत. पुलवामा हल्ल्याच्या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली? पुलवामामध्ये ज्या रस्त्यावरून सीआरपीएफ जवानांनी भरलेली गाडी जात होती, त्या रस्त्याची डागडुजी का करण्यात आले नव्हते? दर २०० मीटरमागे सुरक्षा दल का तैनात केले गेले नव्हते? बॉम्ब शोधक पथक कुठे होते? असे अनेक प्रश्न गंभीर संशय निर्माण करत आहेत.

एस. के. सूद यांनी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अनेक लेखांचा दाखला दिला. त्याला आरडीएक्स घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती असताना त्याला का पकडण्यात आले नाही? पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधी हा अलर्ट मिळाला होता. असे असूनही सुरक्षेसाठी काहीही करता आले नाही. पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मुख्य आरोपी आदिल अहमद डार याचे गाव सर्वांना माहित होते. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच्याकडे स्फोटके असल्याची माहिती मिळाली होती. 13 फेब्रुवारी ला आजूबाजूच्या परिसरात स्फोट झाला होता, ज्यात अनेक मुले जखमी झाली होती. त्यानंतरही कोणीही काळजी घेतली नाही. निष्काळजीपणा करण्यात आला, ज्यात 40 जवान शहीद झाले.

प्रशांत भूषण यांनी नेमकं काय म्हटलं? पहा व्हिडिओ

News Title : Lok Sabha Election 2024 Possibility of Pulwama 2 or attack in Kashi Mathura Ayodhya Mandir check details 02 August 2023.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x