14 May 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर नोट करा! 3 वर्षांत प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह शेअरने 700 टक्के परतावा दिला, पुढेही पैसा देईल

Multibagger Stocks

Multibagger Stocks | प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे डबल केले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका महिन्यात 128 टक्के नफा कमावून दिला आहे. तर एका वर्षात शेअरची किंमत तब्बल 200 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 700 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स अवघ्या 129 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1,000 रुपयेच्या पार गेला आहे.

1 ऑगस्ट 2023 रोजी प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1,026.40 रूपये या विक्रमी उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. इंट्रा-डे ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 1008.90 रुपये किमतीवर पोहचला होता, मात्र नंतर प्रॉफिट बुकींगमुळे शेअरमध्ये किंचित पडझड पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील दिवसअखेर हा स्टॉक 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह 987.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के वाढीसह 1,002.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच भारतीय हवाई दल, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि L & T कंपनी, आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या नवीन ऑर्डरमुळे गुंतवणूकदारांनी प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. 6 जुलै 2023 रोजी प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीने भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून फ्लेअर्स पुरवठ्यासाठी 76.8 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळवली आहे.

भारत डायनॅमिक्स कंपनीकडून बूस्टर ग्रेन पुरवण्यासाठी प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीला 10 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. यासह मोटर्सच्या पुरवठ्यासाठी देखील कंपनीला 43.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. एल अँड टी कंपनीने प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीला 43.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीला मोटर्सचा पुरवठा करण्यासंबंधित 13.9 कोटी रुपये मूल्याची दुसरी ऑर्डर प्राप्त झाली आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीला 725 कोटी रुपयेच्या विविध ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. या ऑर्डरचे काम पूर्ण करण्याचा कालावधी 12 ते 24 महिने निश्चित करण्यात आला आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार तब्बल 1108 कोटी रुपये आहे. FY2023 मधील संपूर्ण कमाईपेक्षा ऑर्डर बुकचा आकार 5.5 पट अधिक आहे.

प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विविध स्फोटके आणि डिटोनेटिव्ह फ्यूज बनवण्याचे काम करते. प्रीमियर एक्स्प्लोसिव्हज कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. आणि कंपनी आपल्या ऑर्डर्स बुकमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. तज्ञांच्यामते जगातील भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कोळशाची मागणी प्रचंड वाढली असून स्फोटकांच्या निर्मितीवर त्याचा परिणामारकरीत्या होणार आहे. या जागतिक युद्धाच्या तणावात गुंतलेले देश विविध देशातून आपली स्फोटकांनी गरज भागवत आहे.

मात्र आपली भारत सरकार देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर जास्त भर देताना पाहायला मिळत आहे. देशात सर्वांसाठी पीएम हाऊसिंग आणि पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन यासारख्या विविध सरकारी योजनांमधून पायाभूत सुविधां पुरवल्या जात आहेत. या विविध सरकारी योजनामुळे विकासाच्या जाहिरातीमुळे, सिमेंट आणि धातूंच्या मागणीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेपामुळे अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेल, स्फोटक बनवण्याचा कच्चा माल याच्या किमतीमध्ये भारतात घट झालेली पाहायला मिळत आहे. कोळशाच्या वाढत्या मागणीनेही स्फोटकांनी किंमत स्थिर ठेवण्यास मदत केली आहे.

प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीला तेलंगणा राज्यात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेटचा स्टॉक करण्याचा परवाना जारी करण्यात आला आहे. याशिवाय स्टील, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम, या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये घट पाहायला मिळत आहे. प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीच्या व्यवसायाला भारतीय संरक्षण क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत.

आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत भारत स्वदेशी संरक्षण साहित्य निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. याचा फायदा देखील प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीला होत आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने आपल्या अहलात माहिती दिली आहे की, संरक्षण विभागातील ऑर्डरमुळे प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीच्या मार्जिनमध्ये जबरदस्त सुधारणा पहायला मिळू शकते. याचा विचार करून तज्ञांनी 795 रूपये स्टॉप लॉससह 1250 रुपये लक्ष किमतीसाठी प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Premier Explosives share Price on 03 August 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x