12 December 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

Canara Bank Share Price | रेखा झुनझुनवाला या बँक शेअरमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत, स्टॉक खरेदीची योग्य संधी आहे?

Canara Bank Share Price

Canara Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी PSU कॅनरा बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेत गुंतवणूक करून आपला भाग भांडवल वाटा 0.59 टक्के वाढवला आहे. कॅनरा बँकेचा शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 326.55 रुपयांवर क्लोज झाला होता. तर मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँक शेअर 2.25 टक्के घसरणीसह 319.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कॅनरा बँक शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 341.60 रुपये होती. तर कॅनरा बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 171.70 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK)

रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक वाढली :
कॅनरा बँकेच्या भाग भांडवलात रेखा झुनझुनवाला यांचा 2.07 टक्के वाटा आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आणि त्यांचे भाग भांडवल प्रमाण आता 2.07 टक्केवर गेले आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेच्या भाग भांडवलात रेखा झुनझुनवाला यांचा वाटा 1.48 टक्के होता. तथापि जून 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेच्या भाग भांडवलात त्यांची हिस्सेदारी 1.96 टक्के होती, जी सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 1.48 टक्के पर्यंत कमी झाली होती. कॅनरा बँकेत किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 37.07 टक्के आहे. कॅनरा बँकेने जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत 20106.92 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या सरकारी मालकीच्या बँकेने सप्टेंबर 2022 तिमाहीत 2525.47 कोटी रुपये नफा मिळवला होता. भारतीय स्टॉक मार्केटमध्ये ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध गुंतवणुकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले होते.

4 महिन्यांत 55 टक्के वाढ :
कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. या PSU बँकेच्या शेअर्स मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर कॅनरा बँकेचे शेअर्स 210.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स BSE इंडेक्सवर 326.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दुसरीकडे कॅनरा बँकेच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 50.5 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या PSU बँकेच्या शेअर्समध्ये 49 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. कॅनरा बँकेच्या शेअर्सनी जानेवारी 2023 महिन्याच्या सुरुवातीला NSE इंडेक्सवर 341.70 रुपये ही आपली 5 वर्षांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Canara Bank Share Price 532483 CANBK in focus check details on 10 January 2023.

हॅशटॅग्स

#Canara Bank Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x