21 May 2024 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Brand Rahul Gandhi | संसदेचं पावसाळी अधिवेशन संपताच मल्लिकार्जुन खर्गे राहुल गांधींसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, मेगा प्लान तयार

Brand Rahul Gandhi

Brand Rahul Gandhi | छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. या पाश्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेचे चालू पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच पुढील आठवड्यापासून मैदानात उतरण्याची योजना आखली आहे. मीडिया सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. या वर्षाच्या अखेरीस ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये अनेक सभा घेण्यात येणार आहेत.

काँग्रेस पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्गे छत्तीसगडमधील रायपूर येथून प्रचाराची सुरुवात करतील. संसदेचे 23 दिवसांचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी 13 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमध्ये ते सभा घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्षांच्या पुढील सभा १८ ऑगस्टला तेलंगणा, २२ ऑगस्टला मध्य प्रदेशातील भोपाळ आणि २३ ऑगस्टला राजस्थानमधील जयपूर येथे होणार आहेत. खर्गे, राहुल यांच्यासह प्रियांका गांधी वाड्रा देखील या राज्यांमध्ये आक्रमकपणे प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात राज्यातील नेत्यांची भेट घेत तयारी, प्रचार आणि रणनीतीवर चर्चा करत आहेत. या बैठकांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा होत आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आतापर्यंत केंद्रीय नेत्यांनी निवडणुकीचे चांगले नियोजन करण्यासाठी २० हून अधिक राज्यांच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पक्षाच्या हरियाणा शाखेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. पक्ष मुख्यालयात झालेल्या बैठकीला खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय भान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

चार दिवसांपूर्वी खर्गे आणि राहुल गांधी यांनी पक्षाच्या तामिळनाडू शाखेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. बैठकीनंतर खर्गे म्हणाले की, तामिळनाडूत द्रमुकसोबत काँग्रेसची आघाडी मजबूत आहे. या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे प्रदेश प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. एस. अलागिरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

News Title : Brand Rahul Gandhi Lok Sabha Election 2024 check details on 08 August 2023.

हॅशटॅग्स

#Brand Rahul Gandhi(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x