5 May 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

केंद्राच्या धोरणांवर टीका | ED पत्रकारांच्या मागे | न्युज पोर्टलच्या कार्यालयावर ईडीची धाड

ED raids, journalist Abhisar Sharma, Newsclick office

नवी दिल्ली, ०९ फेब्रुवारी: हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या ऑफिसवर आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. अभिसार शर्मा सध्या newsclick.in नावाची वेबसाईट चालवतात. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच अनेक शोध पत्रकारितेतून त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचं वास्तव उघड केलं आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर न्युज पोर्टल्स मोदी सरकाविरोधात स्पष्ट बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या कार्यालयावर छापा पडल्याचं म्हटलं जातंय. अनेक पत्रकार या कारवाईनंतर निषेध नोंदवत आहेत.

अभिसार शर्मा यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून छाप्याची माहिती दिली आहे. ईडीने केवळ न्यूज क्लिकच्या ऑफिसवरच नव्हे तर, गुंतवणुकदारांच्या कार्यालयांवरही छापे टाकले असल्याचे शर्मा यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. तसेच पीटीआय’ने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अभिसार शर्मा यांनी एनडीटीव्ही, झी, एबीपी न्यूज यांसारख्या आघाडीच्या हिंदू न्यूज चॅनेलमध्ये न्यूज अँकरपासून एडिटर या पदांवर काम केले आहे. त्यांच्या पत्रकारितेतील कामाची दखलही घेण्यात आली असून, त्यांना दोनवेळा रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून, त्यांना हिंदी अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. 2017मध्ये त्यांना रेड इंक हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता.

 

News English Summary: The office of senior Hindi journalist Abhisar Sharma was raided by the Directorate of Enforcement (ED) today. Abhisar Sharma currently runs a website called newsclick.in. Through this website, he has repeatedly lashed out at the central government, namely the policies of Prime Minister Narendra Modi. He has also exposed the reality of Modi government’s plans through various investigative journalism. Currently, a large number of news portals in the country are clearly speaking against the Modi government. It is said that Sharma’s office was raided against that background. Many journalists are protesting after this action.

News English Title: ED conducts raids journalist Abhisar Sharma Newsclick office news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x