11 December 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Tata Steel Share Price | पोलादी शेअर्स तेजीत, टाटा स्टीलसह अनेक मेटल शेअर्स मालामाल करणार, पुढे फायदाच फायदा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, वेदांता, हिंदाल्को, सेल कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. निफ्टी मेटल निर्देशांक 1.63 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे शेअर्स 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 884.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( टाटा स्टील कंपनी अंश )

वेदांता कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.72 टक्क्यांच्या वाढीसह 360.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 239.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 165.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मेटल इंडेक्समधील हिंदुस्थान झिंक, नॅशनल ॲल्युमिनियम, सेल या कंपन्यांचे शेअर्स 2.23 टक्के ते 3.29 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. हिंदुस्थान झिंक कंपनीचे शेअर्स 211.50 रुपये, नाल्को स्टॉक 187.60 रुपये आणि सेल स्टॉक 154.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा स्टील, वेलस्पन कॉर्पोरेशन, अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांना देखील शेअर बाजारातील तेजीचा फायदा झाला होता. वेदांता स्टॉक सुरुवातीच्या काही तासात 7 टक्के वाढीसह 360.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. वेलस्पन कंपनीचे शेअर्स 571.80 रुपये आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3208 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

भारतीय मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, चीनच्या डेटामध्ये काही सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे चीनमधील मेटलची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. लंडन मेटल एक्सचेंजवर तांबे आणि ॲल्युमिनियम सारख्या धातूंच्या किमती कमालीच्या तेजीत वाढल्या आहेत. त्यामुळे हिंदाल्को, वेदांता, नाल्को या नॉन-फेरस मेटल कंपन्यांच्या शेअर्सची कमाई क्षमता वाढली आहे.

Hindalco Industries, Vedanta Ltd, National Aluminium Company कंपनीच्या शेअरच्या किमती मार्च 2024 मधील नीचांक किंमतीवरून 19-42 टक्के वाढल्या आहेत. जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तज्ञांनी 9 एप्रिल रोजी माहिती दिली की, “चीनमधील पीएमआयमधील सुधारणा, मेटल मागणीत झालेली वाढ या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ करत आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 11 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x