
HB Portfolio Share Price | एचबी पोर्टफोलिओ कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदीला सुरुवात केली आहे. बुधवारी एचबी पोर्टफोलिओ कंपनीने तिमाही निकाल जाहीर केल्यावर कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटममध्ये अडकले होते.
शेअरची किंमत 40.99 रुपये या ओपनिंग किंमतीवरून वाढून 47.42 रुपये किमतीवर पोहचली होती. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी एचबी पोर्टफोलिओ कंपनीचे शेअर्स 5.56 टक्के घसरणीसह 44.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी HB पोर्टफोलिओ कंपनीचे शेअर्स 40.99 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि खरेदी जशी वाढत गेली तसा हा स्टॉक 47.42 रुपयेवर पोहचला. एचबी पोर्टफोलिओ कंपनीच्या धरेची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 49.94 रुपये होती.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 17.48 टक्के वाढली आहे.
HB पोर्टफोलिओ कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले आणि यात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जून तिमाहीत कंपनीने 2.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत कंपनीने 3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर एचबी पोर्टफोलिओ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. जून 2023 तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या तुलनेत 2.90 टक्क्यांचा वाढीसह 3.70 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.