16 May 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज 10 ग्रॅम सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे स्वस्त दर पटापट तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 58900 रुपयांच्या खाली (Today Gold Rate) घसरला आहे. चला तर मग जाणून घेऊया मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे. (Gold Price Today)

आज एमसीएक्स’वर १० ग्रॅम सोन्याचा भाव

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांनी घसरून 58,862 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 70,020 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58843 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी सोने 58969 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १२६ रुपयांनी घसरला आहे.

उच्चांकी पातळीपेक्षा सोनं 2,711 रुपयांनी स्वस्त

सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,711 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 70160 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 70211 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो ५१ रुपयांची घसरण झाली आहे.

आज काय आहे 22 कॅरेट सोन्याची किंमत?

मुंबई आणि पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,450 रुपये, कोलकातामध्ये 54,550 रुपये, लखनऊमध्ये 55,700 रुपये, बंगळुरूमध्ये 54,550 रुपये, जयपूरमध्ये 54,700 रुपये, पाटण्यात 54,600 रुपये, हैदराबादमध्ये 54,550 रुपये आणि भुवनेश्वरमध्ये 54,550 रुपये आहे.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर :

* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59400 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54480 रुपये, 24 कॅरेट सोने : 59430 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59400 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : ५४४८० रुपये, 24 कॅरेट सोने : 59430 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59400 रुपये (Gold Rate Today Mumbai)
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59400 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54480 रुपये, 24 कॅरेट सोने : 59430 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59400 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59400 रुपये

सोनं खरं की खोटं हे कसं तपासावं

तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता की ते खरे की नकली. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 16 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x