
Zen Technologies Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 869.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.. मजबूत ऑर्डर बुक आणि जून 2023 तिमाहीतील जबरदस्त कामगिरीमुळे झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे.
मागील आठ दिवसांत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा आठवड्यात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 883.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जून तिमाहीची कामगिरी :
जून 2023 तिमाहीत झेन टेक्नॉलॉजी कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 474 टक्क्यांच्या वाढीसह 47.13 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत या कंपनीने 8.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण उत्पन्न देखील 35.38 कोटी रुपयेवरून वाढून 135.08 कोटी रुपयेवर पोहचले आहे. याशिवाय, व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई वार्षिक 414 टक्क्यांच्या वाढीसह 68.79 कोटी रुपयेवर पोहचली आहे. मागील आठवड्यात झेन टेक्नॉलॉजी कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून 64.97 कोटी रुपयेची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
झेन टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः सेन्सर आणि सिम्युलेटर तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण प्रशिक्षण प्रणालीचे स्वदेशी डिझाइन, विकास आणि निर्मितीचे काम करते. झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी.भारतीय संरक्षण मंत्रालय, सशस्त्र सेना, सुरक्षा दल पोलीस, निमलष्करी दले यांना प्रशिक्षण उपाय आणि अखंड सेवा प्रदान करण्याचे काम करते. झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी लष्करी प्रशिक्षण सिम्युलेटर, ड्रायव्हिंग सिम्युलेटर, थेट श्रेणी उपकरणे, अँटी ड्रोन सिस्टीम बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.