15 December 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Smart Investment | सरकारच्या 'या' योजनेत 210 रुपये जमा करून मिळते 60 हजार पेंशन, जाणून घ्या सविस्तर - Marathi News

Highlights:

  • Smart Investment
  • ही देखील आहे सुविधा : NPS Vatsalya Scheme
  • अटल पेंशन योजना :
  • काय सांगतात नवीन नियम :
Smart Investment

Smart Investment | प्रत्येक व्यक्तीला आपले म्हातारपणातील दिवस आनंदात जावे असंच वाटत असतं. रिटायरमेंटनंतरच आयुष्य अल्हाददायक जाण्यासाठी अनेक व्यक्ती ठिकठिकाणी पैसे गुंतवून ठेवतात. अनेकजण तर सरकारी योजनांमध्ये देखील पैसे गुंतवणे पसंत करतात. सरकारची अशीच एक फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत तब्बल 6.9 कोटी व्यक्तींनी पैसे गुंतवून लाभ घेतला आहे.

एनपीएस वात्सल्य योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने एका आयोजित कार्यक्रमांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितल्यानुसार ‘अटल पेन्शन योजनेच्या’ सदस्यांच्या यादीची संख्या कोटींच्या घरात पोहोचली आहे. या पेंशनमध्ये तुम्ही कमीत कमी 5 हजार रुपये तर जास्तीत जास्त 60,000 रुपयांइतकी पेंशन प्राप्त करू शकता.

पुढे निर्मला सितारामन असं देखील म्हणाले की, या योजनेमध्ये आतापर्यंत जमा झालेली रक्कम 35,149 कोटी रुपये झाली आहे. त्याचबरोबर या पेंशनमध्ये कर्मचाऱ्याला 60 वर्षानंतर 1 तर 5 हजार रुपयांपर्यंत पेंशन मिळणे सुरू होते.

अटल पेंशन योजना नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे चालवली जाते. त्याचबरोबर ज्या व्यक्ती असंघटित क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर सामान्य व्यक्तींसाठी देखील ही योजना उपलब्ध आहे.

ही देखील आहे सुविधा :
समजा या पेंशनचा लाभार्थी अचानक मृत्युमुखी पावला तर, त्याच्या जोडीदाराला मरेपर्यंत पेंशन मिळत राहते. पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर या योजनेची पेंशन त्यांनी केलेल्या नॉमिनीला मिळू लागते. अटल पेन्शन योजना 2015 साली लॉन्च झाली असून आतापर्यंत 6.9 कोटी व्यक्तींनी या पेंशन योजनेचे सदस्यत्व घेतले आहे आणि एकूण 35,149 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

अटल पेंशन योजना :
या योजनेमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 210 रुपये भरून खातं उघडू शकता. त्याचबरोबर निवृत्तीनंतर म्हणजेच 60 वर्षांपर्यंत सातत्याने गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला किमान 5,000 हजार रुपये पेंशन सुरू राहते.

काय सांगतात नवीन नियम :
सध्याच्या नवीन नियमानुसार 18 वय वर्षाच्या मासिक पेंशनसाठी तुम्हाला 5 हजार रुपयांची रक्कम जोडावी लागेल. यासाठी प्रत्येक महिन्याला 210 रुपये गुंतवल्यास तुमचे काम सोपे होईल. समजा तुम्ही तीन महिन्यांनी सारखी रक्कम भरत असाल तर, तुम्हाला एकूण 626 रुपये जमा करावे लागतील. सहा महिन्यांनी भरल्यास तुम्हाला 1,239 रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला वर्षाला 1000 रुपयांची पेंशन हवी असेल तर, 18 व्या वर्षापासूनच तुम्हाला 42 रुपये द्यावे लागतील.

Latest Marathi News | Smart Investment for Pension 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x