
Zomato Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात विक्रीच्या दाबामुळे बहुतेक कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीचे शेअर्स देखील 1.70 टक्के घसरणीसह 89.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विक्रीचा दबाव असून देखील शेअर बाजारातील तज्ज्ञ झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर उत्साही आहेत. पुढील काही दिवसांत झोमॅटो स्टॉक 115 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करून 2 कोटी रुपये PAT नोंदवला असल्याची माहिती दिली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 189 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. तर मागील वर्षी जून 2022 तिमाहीत कंपनीला 186 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 2.08 टक्के घसरणीसह 89.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शेअरची टार्गेट प्राईस
7 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 102.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 25 जानेवारी 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर 44.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जेएम फायनान्शियल फर्मने झोमॅटो कंपनीच्या शेअरवर 115 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर 11 ऑगस्ट रोजी 2023 मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने झोमॅटो स्टॉकची लक्ष्य किंमत 110 रुपये निश्चित केली आहे. 4 ऑगस्ट 2023 रोजी आयसीआय डायरेक्टने देखील झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर 120 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर 85 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील 25 तज्ञांपैकी 13 तज्ञांनी झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर ‘स्ट्राँग बाय’ रेटिंग देखील स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 8 तज्ञांनी झोमॅटो स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. तर इतर दोन तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स स्ट्राँग सेल रेटिंग देऊन तत्कला विकण्याचा सल्ला दिला आहे. झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने 2023 यावर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 48 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 64 टक्के परतावा दिला आहे. तर मागील एका महिन्यात शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 102.85 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 44.35 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.